महाविद्यालयीन वर्गमित्राने केला विनयभंग
By Admin | Updated: June 19, 2016 02:48 IST2016-06-19T02:48:37+5:302016-06-19T02:48:37+5:30
एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा तिच्याच वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महाविद्यालयीन वर्गमित्राने केला विनयभंग
नागपूर : एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा तिच्याच वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाविद्यालयात सर्वांसमोर तिचा हात पकडून ओढत नेऊन तिला अपमानित केले.
धीरज श्रीकांत वैद्य (१९) रा. हिलटॉप पांढराबोडी असे आरोपीचे नाव आहे. धरमपेठ येथील एका महाविद्यलयात तो शिकतो. पीडित तरुणी त्याच्याच वर्गात शिकते. शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास १९ वर्षीय तरुणी महाविद्यालयाच्या कॅश काऊंटरवर मैत्रिणीसोबत अर्ज भरत उभी होती. दरम्यान, विद्यार्थिनीचा एक नातेवाईक तरुण (भाऊ) काही कामानिमित्त महाविद्यालयात आला होता.
तिला पाहून तो तिच्याशी बोलू लागला. दोघे बोलत असल्याचे दिसून येताच आरोपी धीरज थेट त्या तरुणाला मारहाण करू लागला; तसेच विद्यार्थिनीवर अधिकार गाजवीत तिचा हात पकडून तिला ओढत नेले. हा सर्व प्रकार महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर घडला.
तरुणीच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. (प्रतिनिधी)