महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:08 IST2021-09-13T04:08:41+5:302021-09-13T04:08:41+5:30

कन्हान : आराेपीने महिलेच्या घरात शिरून अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्यांतर्गतच्या मडीबाबा काॅलनी ...

Molestation of a woman | महिलेचा विनयभंग

महिलेचा विनयभंग

कन्हान : आराेपीने महिलेच्या घरात शिरून अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्यांतर्गतच्या मडीबाबा काॅलनी येथे शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. आराेपी सुभाषचंद्र विश्वास गुप्ता (५७, रा. न्यू काॅलनी टेकाडी, कन्हान) याने ४२ वर्षीय महिलेच्या घरात अनधिकृत प्रवेश करून महिला व तिच्या मुलाला ‘माझ्याविरुद्ध पाेलिसात तक्रार का केली’ असे म्हणत त्यांना अश्लील शिवीगाळ करीत खाेट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली. शिवाय आराेपीने महिलेला लज्जा वाटेल अशा प्रकारे साडी ओढून तिला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. महिला व तिच्या दाेन्ही मुलांनी बचाव करून आराेपीला घराबाहेर काढले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कन्हान पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४(अ), ३५४(ब), ४४८, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक आत्राम करीत आहेत.

Web Title: Molestation of a woman