शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

धावत्या रेल्वेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे : त्रिशताब्दी एक्स्प्रेसमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:05 IST

झोपेत असलेल्या एका विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना सोमवारी सकाळी त्रिशताब्दी एक्स्प्रेसमध्ये घडली. गाडी नागपुरात पोहोचल्यानंतर पिडितेच्या संतापलेल्या नातेवाईकांनी आरोपीची धुलाई करून त्यास लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास आमला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ठळक मुद्देलोहमार्ग पोलिस ठाण्यात गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपेत असलेल्या एका विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याची घटना सोमवारी सकाळी त्रिशताब्दी एक्स्प्रेसमध्ये घडली. गाडी नागपुरात पोहोचल्यानंतर पिडितेच्या संतापलेल्या नातेवाईकांनी आरोपीची धुलाई करून त्यास लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास आमला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.मधून अनिल कासवा (२४) रा. गांधी वॉर्ड, हिंगणघाट असे अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. हिंगणघाट येथे त्याचा कापडाचा व्यवसाय आहे. तर पीडित विद्यार्थिनी नागपुरातील रहिवासी असून ती बीएसस्सीला शिकते. काही दिवसांपूर्वी मधूर त्याच्या कुटुंबीयांसह उज्जैन येथे दर्शनासाठी गेला होता. यावेळी कासवा कुटुंबातील जवळपास ५० लोक होते. परतीच्या प्रवासात १२९१३ त्रिशताब्दी एक्स्प्रेसने नागपुरला परत येत होते. मधूर हा बी-१ कोचमध्ये प्रवास करीत होता. तर पीडित विद्यार्थिनीही त्याच कोचमध्ये होती. ती एकटी असल्याची संधी साधून मधूरची वाईट नजर तिच्यावर गेली. बराच वेळ तो तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता. त्याच्या घाणेरड्या प्रकारामुळे ती त्रासली होती. परंतु ती एकटी असल्याने त्याला विरोध करु शकली नाही. त्यामुळे आरोपीची हिंमत वाढली. ती झोपी गेल्यानंतर आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे केले. हा प्रकार बैतुल ते आमला दरम्यान सकाळी ७ ते ७.३० वाजताच्या सुमारास घडला. विद्यार्थिनीने आरडाओरड केल्यामुळे इतर प्रवासी आणि गाडीतील जवान कोचमध्ये पोहोचले. या प्रकारामुळे कोचमधील प्रवाशीही संतप्त झाले. परंतु आरोपीसोबत असलेल्या नातेवाईकांची संख्या अधिक असल्यामुळे प्रवाशी शांत झाले. घटनेची माहिती लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. तसेच पीडित विद्यार्थिनीने नातेवाईकांना कळविले. त्रिशताब्दी एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ५ वर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पोहोचणार असल्याने तिचे नातेवाईक आधीच पोहोचले. मधूरला लोहमार्ग ठाण्यात आणत असतानाच पीडितेच्या नातेवाईकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण पवार यांनी त्याच्याविरूध्द कलम ३५४ अंतर्गत गुन्हा नोंदविला. त्यानंतर पोलीस त्याला आमला येथे घेऊन गेले. हे प्रकरण हेड कॉन्स्टेबल ऑजवेल्ड थॉमस यांनी हाताळले.लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोर गोंधळआरोपीला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याचे ५० नातेवाईक आणि पिडीत विद्यार्थिनीचे नातेवाईक लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. बराच वेळपर्यंत त्यांच्यात वाद सुरु होता. प्रकरण मिटविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु पोलीस निरीक्षक वासुदेव डाबरे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे सर्वजण शांत झाले. यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही नागपूर विभागातील दोन टीसी या प्रकरणात मध्यस्थी करीत होते. त्यांनी फिर्यादीला भेटुन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. यात एका महिला टीसीचा समावेश होता. एका विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याच्या प्रकरणात टीसींनी मध्यस्थी केल्यामुळे लोहमार्ग पोलीसांनीही आश्चर्य व्यक्त केले.

टॅग्स :Molestationविनयभंगrailwayरेल्वे