शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीत कटुता निर्माण झाल्यामुळे केली छेडखानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 21:51 IST

मैत्रीत कटुता निर्माण झाल्यामुळे एका विवाहित व्यक्तीने युवतीची छेडखानी केल्याची घटना लकडगंज ठाण्यांतर्गत घडली आहे. आतापर्यंत तीन ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देतीन ठाण्यात गुन्हे दाखल : प्रकरण पोलिसांसाठी ठरतेय डोकेदुखीचे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मैत्रीत कटुता निर्माण झाल्यामुळे एका विवाहित व्यक्तीने युवतीची छेडखानी केल्याची घटना लकडगंज ठाण्यांतर्गत घडली आहे. आतापर्यंत तीन ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत.गगनदीप सिंह असे आरोपीचे नाव आहे. गगनदीप ट्रान्सपोर्टर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारकर्ती २३ वर्षीय युवती पूर्वी डीजेचे काम करीत होती. काही दिवसांपासून ती गारमेंटच्या दुकानात काम करते. तीन वर्षांपासून तिची गगनदीपशी मैत्री आहे. गगनदीप विवाहित आहे. दोघांमध्ये मैत्री होती. काही दिवसांपासून दोघांमध्ये कटुता निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू आहे. दोघांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाला आहे. युवतीने नंदनवन आणि सीताबर्डी ठाण्यात गगनदीपविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गगनदीपच्या विरुद्ध छेडखानी, धमकी देणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल केल्यानंतर पुन्हा त्यांच्यात मैत्री झाली होती. दरम्यान युवतीची आणखी एका ट्रान्सपोर्टरच्या मुलाशी मैत्री झाली. त्यामुळे गगनदीप संतापला. त्याने ट्रान्सपोर्टरच्या मुलाला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा दोघांचे संबंध खराब झाले. युवतीच्या तक्रारीनुसार ८ सप्टेंबरला ती घरून दुकानात जात होती. त्यावेळी गगनदीप तिला भेटला. गगनदीपने तिला आपल्या कार क्रमांक एम. एच. ४०, ए. आर-८०५५ मध्ये बस फिरायला जाऊ असे सांगितले. त्याला नकार दिला असता त्याने जबरदस्तीने तिचा हात पकडून कारमध्ये बसविले आणि लज्जास्पद वर्तन केले. युवतीने लकडगंज ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी छेडखानीचा गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून गगनदीप फरार आहे. हे प्रकरण पोलिसांसाठी अनेक दिवसांपासून डोकेदुखीचे ठरले आहे. नंदनवन आणि सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दोघांनाही एकमेकांपासून दूर राहण्याची तंबी दिली होती. परंतु त्यानंतरही त्यांच्यात मैत्री झाली. गगनदीपच्या मोबाईलची तपासणी केल्यास त्यांच्यातील मैत्रीची सत्यता जाणून घेतल्या जाऊ शकते. गगनदीपच्या वागणुकीत बदल न झाल्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी घटना घडू शकते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग