शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटांचे ‘एनसायक्लोपीडिया’ ज्येष्ठ सिनेवितरक मोहनसिंग अरोरा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:01 IST

कधी काळी सायकलवर फिरून चित्रपटांचे प्रमोशन करणारे, सिनेक्षेत्राची इत्थंभूत माहिती असलेले चित्रपटांचे ‘एनसायक्लोपीडिया’ आणि जुन्या काळातील ज्येष्ठ सिनेवितरक मोहनसिंग अरोरा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कधी काळी सायकलवर फिरून चित्रपटांचे प्रमोशन करणारे, सिनेक्षेत्राची इत्थंभूत माहिती असलेले चित्रपटांचे ‘एनसायक्लोपीडिया’ आणि जुन्या काळातील ज्येष्ठ सिनेवितरक मोहनसिंग अरोरा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.मोहनसिंग यांनी ५० पेक्षा अधिक वर्षे चित्रपट वितरणाच्या क्षेत्रात काम केले. दारासिंग, देव आनंद, धर्मेंद्र, जितेंद्र, बलराज साहनी, प्रेम चोपडा, खय्याम, बडजात्या कुटुंब अशा कितीतरी मोठ्या स्टार्सशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते व हे कलावंत कधी नागपूरला आले की मोहनसिंग यांची भेट ठरलेली असायची. वृद्धापकाळात परिस्थिती हालाखीची झाल्याने त्यांना झोपडीत दिवस काढावे लागत होते. तत्कालिन सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. राज्य शासनातर्फे पंचशील टॉकीज येथे झालेल्या चित्रपट महोत्सवात त्यांना सन्मानित करण्यात आले. कामठी रोडवरील टेकानाका परिसरात वास्तव्यास असलेल्या मोहनसिंग एका सिने नियतकालिकात चित्रपट व्यवसायाबाबत लेखन करायचे. देशभरात फ्लॉप झालेले चित्रपट नागपुरात चालवून दाखवायची क्षमता त्यांच्यात होती. त्यामुळे चित्रपट सृष्टीत त्यांच्याविषयी आदर होता. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती व मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिने क्षेत्राचा जुना जाणकार हरविल्याची संवेदना या क्षेत्राशी जुळलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर