सुमेध वाघमारेनागपूर : दोघांच्याही नावात मोहम्मद होते. एक मोहम्मद रफी तर दुसरा मोहम्मद अझीझ. मोहम्मद रफींची गायनाची शैली अंगिकारून मोहम्मद अझीझ यांनी आयुष्यभर संगीताची पूजा बांधली, म्हणूनच त्यांना मोहम्मद रफींची ‘सावली’ संबोधले जायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात समग्र मानव कल्याणाचा संदेश देणाऱ्या धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे मोहम्मद अझीझ यांचे नागपूरवर विशेष प्रेम होते.एका कार्यक्रमाच्यानिमित्ताने २५ एप्रिल २०१४ रोजी ते नागपुरात आले असताना एका खासगी चॅनलने त्यांची मुलाखत घेतली. यात त्यांनी आपल्या जीवनातील काही अंतरंग उलगडले होते. विशेषत: बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ते भरभरून बोलले.बाबासाहेबांमुळेच खऱ्या अर्थाने अस्पृश्य समाज स्वतंत्र झाला. हा महामानव जन्माला आला नसता तर गावकुसाबाहेरचा हा वंचित समाज कधीच समाजाच्या मुख्य प्रवाहाचा भाग झाला नसता, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. ही मुलाखत प्रत्यक्ष पाहणाऱ्या शेकडो नागपूरकरांनी तेव्हा मोहम्मद अझीझ यांच्या या आंबेडकरप्रेमाचे विशेष कौतुकही केले होते. आज त्यांच्या मृत्यूची बातमी शहरात धडकली आणि त्या गाजलेल्या मुलाखतीचे सर्वांना स्मरण झाले.मोहम्मद अझीझ यांचा जन्म २ जुलै १९५४ रोजी पश्चिम बंगालमधील अशोकनगर येथे झाला. १९८०-९० दरम्यान त्यांनी सुपरहिट गाणी गायली. दूध का कर्ज, खुदा गवाह, हीना, स्वर्ग, गीत यासारख्या चित्रपटांत पार्श्वगायन केले. तर ‘मर्द टांगेवाला’, ‘लाल दुपट्टा मलमल का’, ‘मैं से मीना से न साकी’, ‘आपके आ जाने से’ प्यार हमारा अमर रहे, ऐ मेरे दोस्त, तेरी बेवफाई का शिकवा, मितवा भूल ना जाना, फूल गुलाब का, दुनिया में कितना गम है, रब को याद करू, बहुत जताते हो, तू कल चला जायेगा, यासारखी सुपरहिट गीते दिली.
मोहम्मद रफींची ‘सावली’ हरवली : गायक मोहम्मद अझीझ यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:14 IST
दोघांच्याही नावात मोहम्मद होते. एक मोहम्मद रफी तर दुसरा मोहम्मद अझीझ. मोहम्मद रफींची गायनाची शैली अंगिकारून मोहम्मद अझीझ यांनी आयुष्यभर संगीताची पूजा बांधली, म्हणूनच त्यांना मोहम्मद रफींची ‘सावली’ संबोधले जायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात समग्र मानव कल्याणाचा संदेश देणाऱ्या धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे मोहम्मद अझीझ यांचे नागपूरवर विशेष प्रेम होते.
मोहम्मद रफींची ‘सावली’ हरवली : गायक मोहम्मद अझीझ यांचे निधन
ठळक मुद्देनागपुरात केले होते बाबासाहेबांच्या महानतेचे कौतुक