भाजपच्या प्रचाराला मोदी येणार

By Admin | Updated: September 27, 2014 02:37 IST2014-09-27T02:37:26+5:302014-09-27T02:37:26+5:30

भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी पक्षाचे स्टार प्रचारक आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भात येणार असून त्यांच्या ...

Modi will be campaigning for BJP | भाजपच्या प्रचाराला मोदी येणार

भाजपच्या प्रचाराला मोदी येणार

नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी पक्षाचे स्टार प्रचारक आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भात येणार असून त्यांच्या पूर्व आणि पश्चिम विदर्भात प्रत्येकी एक अशा दोन सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
कुठल्याही परिस्थितीत येती विधानसभा निवडणूक जिंंकायचीच असा निश्चिय भारतीय जनता पक्षाने केला असून त्यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे. नेते संपूर्ण विदर्भ पिंजून काढणार आहेत. मोदी यांच्या विदर्भ दौऱ्याची तारीख अद्याप ठरली नसली तरी त्यांच्या पूर्व आणि पश्चिम विदर्भात दोन सभांचे नियोजन आहे. मात्र त्यात नागपूरच्या सभेचा समावेश नाही. पूर्व विदर्भात गोंदिया-भंडारा जिल्ह्यालगत ही सभा होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याही दोन सभा होणार आहेत. विदर्भातील प्रचाराची जबाबदारी प्रामुख्याने गडकरी यांच्यावर आहे. त्यांच्याही प्रचार दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विदर्भाला लागून असलेले मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि त्या राज्यातील इतर मंत्रीही प्रचारासाठी येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. प्रचारासाठी दिवस कमी असल्याने कमीत कमी वेळेत जास्तीतजास्त मतदारसंघात कसे जाता येईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांसोबतच राज्यातील नेत्यांच्याही सभा आयोजित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Modi will be campaigning for BJP