शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करताहेत मोदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 20:44 IST

नागरिकता सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करीत आहेत. या विधेयकाचा विरोध करणाऱ्या दिल्लीतील विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या अमानुष माराहाणीचा काँग्रेस आंदोलनाद्वारे निषेध करीत आहे.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसची नारे-निदर्शने

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागरिकता सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करीत आहेत. या विधेयकाचा विरोध करणाऱ्या दिल्लीतील विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या अमानुष माराहाणीचा काँग्रेसआंदोलनाद्वारे निषेध करीत आहे. मोदी सरकारच्या दडपशाहीच्या धोरणाविरुद्ध संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिली.विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ नारे-निदर्शने करण्यात आली.थोरात म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरातील विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष माराहाण केली. माराहाणीच्या निषेधार्थ प्रियंका गांधी इंडिया गेट येथे आंदोलन करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र्र सरकार विद्यार्थ्यांवर पोलिसांमार्फत हल्ले करीत आहे, हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध नारेबाजी केली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत, खा. बाळू धानोरकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ. यशोमती ठाकूर, आ. विजय वडेट्टीवार, आ. अमित झनक, आ. प्रतिभा धानोरकर, आ. प्रणिती शिंदे, आ. सुभाष धोटे, आ. राजू पारवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, माजी मंत्री अनिल अहमद, अतुल कोटेचा, अभिजित वंजारी, अतुल लोंढे, प्रशांत धवड, उमाकांत अग्निहोत्री, अमिन पटेल, मुझफ्फर हुसेन, तनवीर अहमद विद्रोही, मुजाईत खान, रौनक चौधरी, कुणाल पाटील, लहू कानडे, अस्लम शेख, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, राजू आवळे, संजय जगताप, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, विक्रम सावंत यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन