शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मॉडर्न स्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर्स व सांदीपनी महापौर चषकाचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 23:59 IST

महापालिकेच्या क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित महापौर चषक वंदेमातरम् समूहगान स्पर्धेच्या अंतिम फेरीत मॉडर्न स्कूल कोराडी रोड, स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले-आऊट व सांदीपनी स्कूल हजारीपहाड या शाळांचे संघ महापौर चषकाचे मानकरी ठरले.

ठळक मुद्देमहापौर चषक वंदेमातरम् समूहगान स्पर्धेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित महापौर चषक वंदेमातरम् समूहगान स्पर्धेच्या अंतिम फेरीत मॉडर्न स्कूल कोराडी रोड, स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले-आऊट व सांदीपनी स्कूल हजारीपहाड या शाळांचे संघ महापौर चषकाचे मानकरी ठरले. त्यांनी अनुक्रमे पहिल्या गटात इयत्ता ९ वी ते १० वी, दुसऱ्या गटात इयत्ता ६वी ते ८ वी व तिसऱ्या गटात इयत्ता १ ली ते ५ पाचवी या गटातून प्रथम क्रमांक पटकावला. तिन्ही गटातील विजेत्या संघाला शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे व अन्य मान्यवरांच्या हस्ते महापौर चषक, १० हजार रुपये रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.बुधवारी सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. तिन्ही गटातील विजेत्या, उपविजेत्या,तृतीय क्रमांक प्राप्त संघांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून दिलीप दिवे उपस्थित होते. तत्पूर्वी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या हस्ते स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन झाले. अंतिम फेरीत ९वी ते १०वी या भवन्स बी.पी. विद्या मंदिर संघ उपविजेता ठरला. नागपूर महापालिकेच्या बॅरिस्टर शेषराव वानखेडे विद्यानिकेतन संघाने तिसरा क्रमांक पटकावला तर बी.आर.एस. मुंडले साऊथ अंबाझरी शाळेला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.६ वी ते ८ वी गटामध्ये साऊथ पॉईंट स्कूल ओंकार नगर संघाने उपविजेतेपद,भारतीय विद्या भवन्स त्रिमूर्ती नगर संघाने तिसरे स्थान प्राप्त केले. प्रोत्साहन बक्षीस मनपाच्या दुर्गा नगर माध्यमिक शाळा संघाला मिळाले,१ली ते ५ वी या गटात स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी संघ उपविजेता तर भारतीय विद्या भवन्स श्रीकृष्ण नगर संघाने तृतीय क्रमांक मिळविला. मनपाच्या विवेकानंद हिंदी प्राथमिक शाळेला प्रोत्साहन पुरस्कार मिळाला. उपविजेत्या संघाला चषक, सात हजार तर तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये रोख व भेटवस्तू देण्यात आल्या. प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून तीन हजार व चषक व भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी परीक्षकांचाही सत्कार केला.

टॅग्स :MayorमहापौरSchoolशाळाVande Mataramवंदे मातरम