मॉडर्न होमिओपॅथी व नामवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:08 IST2021-02-13T04:08:37+5:302021-02-13T04:08:37+5:30
नागपूर : कोल्हापुरातील मॉडर्न होमिओपॅथी व नामवंत लॅबतर्फे रविवार, १४ रोजी रक्त तपासणी शिबिर आयोजित केले आहे. किडनी, कॅन्सर, ...

मॉडर्न होमिओपॅथी व नामवंत
नागपूर : कोल्हापुरातील मॉडर्न होमिओपॅथी व नामवंत लॅबतर्फे रविवार, १४ रोजी रक्त तपासणी शिबिर आयोजित केले आहे. किडनी, कॅन्सर, लिव्हर, मधुमेह, स्थूलपणा, हृदयरोग, मूत्रविकार, थायरॉईड यांच्या ७१०० रुपयांच्या चाचण्या या शिबिरात १५९९ रुपयांत केल्या जाणार आहेत. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ला पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. एरव्ही कन्सल्टिंग फी ५०० रुपये घेतली जाते, पण शिबिर काळात ती घेतली जाणार नाही. रविवारी विजय भवन, पहिला माळा, जैन मेडिकल स्टोअरवर, लोकमत चौक, धंतोली येथे ८ ते ११ या वेळेत होणाऱ्या या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मॉडर्न होमिओपॅथीतर्फे करण्यात आले आहे. तपासणीसाठी येताना १२ तास उपाशीपोटी यावे, असेही सांगण्यात आले आहे. (वा.प्र.)