अपघाताच्या स्थितीवर नियंत्रणासाठी मॉकड्रील

By Admin | Updated: March 31, 2017 02:58 IST2017-03-31T02:58:48+5:302017-03-31T02:58:48+5:30

रेल्वेच्या इंजिनची जेथे प्रत्यक्षात देखभाल करण्यात येते त्या अजनी इलेक्ट्रीक लोकोशेडमध्ये सुरक्षेबाबत काय उपाययोजना आहे,

Mockredral to control the state of the accident | अपघाताच्या स्थितीवर नियंत्रणासाठी मॉकड्रील

अपघाताच्या स्थितीवर नियंत्रणासाठी मॉकड्रील

अजनी लोकोशेड : कर्मचाऱ्यांना दिले सुरक्षिततेचे धडे
नागपूर : रेल्वेच्या इंजिनची जेथे प्रत्यक्षात देखभाल करण्यात येते त्या अजनी इलेक्ट्रीक लोकोशेडमध्ये सुरक्षेबाबत काय उपाययोजना आहे, पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोको शेड सज्ज आहे की नाही, येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लोकोशेडमधील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले.
अजनी लोकोशेड हा मध्य रेल्वेतील इंडिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टीम (आयएमएस) असलेले पहिले शेड आहे. अजनी इलेक्ट्रीक लोकोशेडला यापूर्वी ९००१, २००८ मानांकन मिळाले होते. यात आता आणखी आयएसओ १४००१, १८००१ हे मानांकन येण्यासाठी येथे मॉकड्रीलचे आयोजन करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यात लोकोशेडमध्ये आग लागल्याचे दृश्य तयार करून रुग्णवाहिकेला दूरध्वनी करण्यात आला.
रुग्णवाहिका १५ मिनिटात लोकोशेडमध्ये आल्यानंतर आगीत दुखापत झालेल्या व्यक्तीला प्रथमोपचारानंतर रुग्णवाहिकेत टाकून अजनी रेल्वे कॉलनीत नेण्यात आले. त्यानंतर ही एक मॉकड्रील असल्याची बाब जाहीर करण्यात आली. मॉकड्रीलमध्ये पर्यावरणाचे रक्षण, प्रत्यक्ष काम करताना काय काळजी घ्यावी, सुरक्षेबाबतची उपकरणे सुसज्ज आहेत की नाही याची चाचपणी करण्यात आली.
आग लागल्यास सर्व कर्मचाऱ्यांनी कोठे एकत्र जमायचे, कोणत्या रस्त्याने जायचे याची इत्थंभूत माहिती देण्यात आली. आग विझविण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करावा आदीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी सेंट जॉन रुग्णवाहिकेची चमू घटनास्थळी पोहोचली. (प्रतिनिधी)

Web Title: Mockredral to control the state of the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.