‘त्या’ आरोपीकडे सापडले ११ प्रवाशांचे मोबाईल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:06 IST2021-07-03T04:06:30+5:302021-07-03T04:06:30+5:30

नागपूर : धावत्या रेल्वेगाडीतील प्रवाशांच्या हातावर काठी मारून त्यांचे मोबाईल खाली पाडायचे अन् ते घेऊन पळ काढायचा. असे करून ...

Mobiles of 11 passengers found in 'that' accused () | ‘त्या’ आरोपीकडे सापडले ११ प्रवाशांचे मोबाईल ()

‘त्या’ आरोपीकडे सापडले ११ प्रवाशांचे मोबाईल ()

नागपूर : धावत्या रेल्वेगाडीतील प्रवाशांच्या हातावर काठी मारून त्यांचे मोबाईल खाली पाडायचे अन् ते घेऊन पळ काढायचा. असे करून असंख्य प्रवाशांचे मोबाईल पळविणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून त्याच्याकडून ७९ हजार ८५१ रुपये किमतीचे ११ मोबाईल जप्त केले आहेत.

मागील अनेक दिवसापासून आऊटरकडील भागात रेल्वेगाडीचा वेग मंदावल्यानंतर कोचच्या दारावर मोबाईलवर बोलत असलेल्या प्रवाशांच्या हाताला काठी मारून त्यांचे मोबाईल खाली पाडून ते पळविण्याच्या घटनात वाढ झाली होती. २६ जून २०२१ रोजी कुलदीप तापीप्रसाद सिसोदिया (३२) हे बैतूल-नागपूर असा प्रवास करीत होते. डी कॅबिनकडील भागात गाडीचा वेग कमी झाल्यानंतर ते जनरल कोचच्या दारावर मोबाईलवर बोलत उभे होते. यावेळी रेल्वे रुळाच्या बाजूला काठी घेऊन उभा असलेला आरोपी प्रियांशू ऊर्फ बाबु रवी क्षेत्री (२०) रा. ख्रिश्चन कॉलनी, मेकोसाबाग याने त्यांच्या हातावर काठी मारून त्यांचा १८ हजाराचा मोबाईल खाली पाडून पळून गेला. संबंधित प्रवाशाने याची तक्रार लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचा शोध सुरू केला होता. एलसीबीला गुप्त बातमीदाराने आरोपीची माहिती दिल्यानंतर त्यांनी आरोपीस अटक केली. चौकशीत त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून प्रवाशांचे पळविलेले ७९ हजार ८५१ रुपये किमतीचे ११ मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत. तपास संदीप धंदर करीत आहेत.

..........

Web Title: Mobiles of 11 passengers found in 'that' accused ()