दोन वर्षानंतर सापडला मोबाईल चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:29+5:302021-07-31T04:09:29+5:30
नागपूर : ‘इंतजार का फल मिठा होता है’ असे म्हणतात. परंतु प्रत्येक बाबतीत ही म्हण खरी ठरत नाही, याची ...

दोन वर्षानंतर सापडला मोबाईल चोर
नागपूर : ‘इंतजार का फल मिठा होता है’ असे म्हणतात. परंतु प्रत्येक बाबतीत ही म्हण खरी ठरत नाही, याची प्रचिती नागपूर रेल्वेस्थानकावर आली. चोरी केलेला मोबाईल आरोपीने पकडल्या जाऊ या भीतीने दोन वर्षे घरातच ठेवला. दोन वर्षानंतर आता काहीच होणार नाही असा विचार करून त्याने मोबाईल विकला. मोबाईल खरेदी करणाऱ्याने सीम टाकून तो सुरू केला अन् दोन्ही आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात सापडले.
फिर्यादी केशव मारोती सुतारे (१९) रा. प्लॉट नं. १२४, कटरे हाऊसिंग टाकळघाट बुटीबोरी नागपूर
याचा १२,९९९ रुपये किमतीचा मोबाईल रेल्वे परिसरातून १७ जून २०१९ रोजी चोरीला गेला होता. त्यामुळे त्याने लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल केली होती. लोहमार्ग पोलिसांनी हा मोबाईल ट्रेसिंगवर लावला होता. परंतु दोन वर्ष होऊनही या मोबाईलचा पत्ता लागला नाही. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोबाईल ट्रेसिंगची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आरोपी रवींद्र भरतलाल चौधरी (२७) रा. रजेगाव (छोटा) गोंदिया यास ताब्यात घेतले. रवींद्रने हा मोबाईल आपण उमेश सतीश पारधी (३२) रा. कृष्णापुरा वॉर्ड, वर्धा रोड, गोंदिया याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली. दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास विजय मरापे करीत आहेत.
..........