दीड तासात मोबाइल चोराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:09 IST2021-09-27T04:09:06+5:302021-09-27T04:09:06+5:30

रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या निर्देशानुसार नागपूर ठाण्याचे निरीक्षक आर. एल. मीना यांनी गुन्हेगारांचा ...

Mobile thief arrested in an hour and a half | दीड तासात मोबाइल चोराला अटक

दीड तासात मोबाइल चोराला अटक

रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या निर्देशानुसार नागपूर ठाण्याचे निरीक्षक आर. एल. मीना यांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी एक टीम गठित केली आहे. त्यानुसार आरपीएफ जवान श्याम झाडोकर यांनी सीसीटीव्ही स्टाफ टोपराम रहांगडालेच्या मदतीने सीसीटीव्हीच्या माध्यमातून एका संशयित व्यक्तीचा शोध घेतला. त्यांनी राजू खोब्रागडे यांच्या मदतीने आरोपीला दीड तासात पकडले. त्याला आरपीएफ जवान संजय खंडारे याच्या मदतीने आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याने आपले नाव प्रथमेश जगदीश ईश्वरकर (१९, रा. जवाहरनगर, अकोला) असे सांगितले. चौकशीत त्याने एका झोपलेल्या प्रवाशाचा १४ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या विरुद्ध कागदोपत्री कारवाई करून त्यास लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

............

Web Title: Mobile thief arrested in an hour and a half