शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातल्या प्रेमवीराने केली ‘गर्ल फ्रेण्ड’साठी लूटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 09:57 IST

गर्लफ्रेंडवर पैसे उधळण्यासाठी बनावट पिस्तुलांचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा प्रतापनगर पोलिसांनी छडा लावला.

ठळक मुद्देबनावट पिस्तुलाचा धाक दाखवून ३७ मोबाईल हिसकावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गर्लफ्रेंडवर पैसे उधळण्यासाठी बनावट पिस्तुलांचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा प्रतापनगर पोलिसांनी छडा लावला. टोळीतील तिघांना अटक करून त्यांच्याकडून दोन बनावट पिस्तुलांसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चौघांच्या या टोळीत एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.४ जानेवारीला प्रतापनगरातील एका व्यक्तीचा रेडमी एमआय-४ फोन काही तरुणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटून नेला होता. तक्रार मिळताच प्रतापनगर पोलिसांनी हिसकावून नेलेल्या मोबाईलवरून आरोपी कुणाला कॉल करीत आहेत, त्याचा सीडीआर काढला. त्याआधारे आठवा मैल (वाडी), द्रुगधामना येथे राहणारे अभिषेक अजय शेंडे (वय १९), प्रशिक पृथ्वीराज ढोके (वय १८) आणि महेंद्र रमेश मांगे (वय २१, रा. दुरखेडा बोरगाव, धापेवाडा) या तिघांना त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारासह अटक केली. त्यांच्याकडून लुटमारीतील मोबाईल जप्त करण्यात आला. त्यांचा ८ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला.चौकशीत या टोळीने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. रात्रीच्या वेळी फिरायला निघणाऱ्या, रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणाऱ्या व्यक्तींना आरोपी रोखत होते. त्यांना बनावट (खेळण्याचे) पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून पळून जात होते. त्यांनी अशाप्रकारे सीताबर्डी, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, महाराजबाग मार्ग, अंबाझरी, रविनगर, संत्रा मार्केट, रामझुला परिसरातून गुन्हे करीत ३७ मोबाईल आणि दोन मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली.पोलिसांनी हा चार लाख तीन हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला. आपण ही लुटमार मौजमजा करण्यासाठी आणि मैत्रिणींवर पैसे उधळण्यासाठी करीत होतो, अशी कबुलीही आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे.या टोळीचा छडा लावण्याची कामगिरी परिमंडळ-१ च्या उपायुक्त स्मार्तना पाटील, राकेश ओला, सहायक आयुक्त शेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापनगरचे ठाणेदार शिवाजीराव गायकवाड, द्वितीय निरीक्षक चंद्रकांत माने यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक सचिन शिर्के, हवालदार शंकर कोडापे, शिपाई सतीश येसनकर, आनंद यादव, सतीश ठाकरे, अतुल तलमले, आशिष क्षीरसागर, अभिषेक हरदास, धर्मेंद्र यादव, शारिक शेख आदींनी बजावली.पालकांनो सावध व्हापोलिसांनी ताब्यात घेतलेले चारही आरोपी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. कॉलेजला जातो असे सांगून ते बाहेर पडायचे व लूटमार करायचे. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज या गुन्ह्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांची कार्यपद्धती अट्टल गुन्हेगारांनाही मागे टाकणारी आहे. लुटलेले मोबाील ते महाविद्यालयीन तरुण तसेच गोरगरिबांना कमी पैशात विकत होते. या प्रकरणामुळे पोलिसांनी कुणी कमी पैशात वस्तू विकत असेल तर ती घेण्यापूर्वी शहानिशा करावी असे आवाहन नागरिकांना केले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा