शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

मोबाईल चोराला अडीच मिनिटात सिनेस्टाईल पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:27 IST

रात्री २.२० वाजता पुणे-हटिया एक्स्प्रेस या चालत्या गाडीतून उतरणाऱ्या आरोपीवर आरपीएफ जवानांनी प्रश्नांची सरबत्ती केली. आरोपीने रेल्वे रुळावर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आरपीएफ जवानांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत अडीच मिनिटात त्यास वेटिंग रुममध्ये अटक केली, अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देज्योती कुमार सतीजा यांची माहिती : आरपीएफ जवानांनी दाखविली समयसूचकता

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रात्री २.२० वाजता पुणे-हटिया एक्स्प्रेस या चालत्या गाडीतून उतरणाऱ्या आरोपीवर आरपीएफ जवानांनी प्रश्नांची सरबत्ती केली. आरोपीने रेल्वे रुळावर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आरपीएफ जवानांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत अडीच मिनिटात त्यास वेटिंग रुममध्ये अटक केली, अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.सतीजा म्हणाले, सोमवारी रात्री २ वाजता रेल्वेगाडी क्रमांक २२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभी होती. ही गाडी २.२० वाजता पुढील प्रवासासाठी निघाली. तेवढ्यात एक व्यक्ती चालत्या गाडीतून खाली उतरला. ड्युटीवरील आरपीएफ जवान संजय खंडारे, कामसिंह ठाकूर, शेख शकील यांना त्याच्या हालचालीवर शंका आली. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव राजेश हरिशंकर पांडे (३५) रा. देवास मध्य प्रदेश असे सांगितले. त्याने आपण पोलीस असल्याचे सांगितले. परंतु तो पोलीस नसल्याची शंका आरपीएफच्या जवानांना आली. त्याने ओळखपत्र दाखविण्यास मनाई केली. त्याने आपल्या जवळील बॅग खाली काढून ठेवली. मोबाईलवर बोलण्याचे नाटक करतानाच त्याने रेल्वे रुळावर उडी घेतली. मालगाडीला ओलांडून तो प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या वेटिंग रुममध्ये पोहोचला. ओळख पटू नये यासाठी त्याने अंगातील लाल रंगाचे टी-शर्ट आणि मिलिटरी रंगारी कॅप काढून फेकली. तो खिडकीतून पळून जात असतानाच आरपीएफच्या जवानांनी त्यास अटक केली. त्याच्या जवळील बॅगमधून ६१,०१५ रुपये किमतीचे ७ मोबाईल, २,३६० रुपये असलेले पाकीट, ब्लेड, मोटारसायकलची चावी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.विविध गाड्यांमधून चोरले मोबाईलताब्यात घेतल्यानंतर आरोपीने प्रवाशांचे सात मोबाईल विविध रेल्वेगाड्यातून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी देवास मध्यप्रदेश येथे आॅटो चालवीत असल्याचे त्याने आरपीएफला सांगितले. सहायक उपनिरीक्षक बघेल यांनी कागदोपत्री कारवाई करून आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले.आरपीएफ जवानांना पुरस्कारआरपीएफ जवानांनी आरोपीला पकडण्यात दाखविलेल्या समयसूचकतेचे ज्योती कुमार सतीजा यांनी कौतुक केले. मोबाईलवर बोलताना आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तेवढ्यात वेगाने प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून धावत जवानांनी अडीच मिनिटात त्यास रंगेहात अटक केली. जवानांच्या या कार्यासाठी सतीजा यांनी संजय खंडारे, कामसिंह ठाकूर, शेख शकील यांना प्रमाणपत्र आणि रोख दोन हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले.

टॅग्स :railwayरेल्वेtheftचोरी