प्रवाशाला परत केला रेल्वेतून पडलेला मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:10 IST2020-12-30T04:10:20+5:302020-12-30T04:10:20+5:30

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने प्रवासात नागपूर रेल्वेस्थानकावर पडलेला प्रवाशाचा १५ हजाराचा मोबाईल त्यास परत केला. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी ...

Mobile returned from the train to the passenger | प्रवाशाला परत केला रेल्वेतून पडलेला मोबाईल

प्रवाशाला परत केला रेल्वेतून पडलेला मोबाईल

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने प्रवासात नागपूर रेल्वेस्थानकावर पडलेला प्रवाशाचा १५ हजाराचा मोबाईल त्यास परत केला. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी ड्युटीवर तैनात आदेश गुप्ता या जवानास नागपूर रेल्वेस्थानकाच्या २/३ प्लॅटफार्मवर मुंबई एण्डकडील भागात एक मोबाईल मिळाला. या मोबाईलवर एका प्रवाशाचा फोन आला. त्याने हा मोबाईल आपला असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रकाश तेज सिंह (५०) रा. मलखानगिरी ओडिशा हा प्रवासी रेल्वेगाडी क्रमांक ०२८०६ नवी दिल्ली-विशाखापट्टनम विशेष रेल्वेगाडीने सेवाग्रामला उतरून मोबाईल घेण्यासाठी नागपूरला आला. तेथे त्यांनी आपण एस-२, बर्थ क्रमांक ३९ वरून नवी दिल्लीवरून खम्ममला जात असल्याची माहिती दिली. दरम्यान, रेल्वेस्थानकावर त्यांचा मोबाईल पडला. सहायक उपनिरीक्षक सी. बी. अहिरवार यांनी चौकशी केल्यानंतर कागदोपत्री कारवाई करून मोबाईल प्रकाश तेज सिंह यांना परत केला.

...........

Web Title: Mobile returned from the train to the passenger