राेख रकमेसह माेबाईल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST2021-06-27T04:07:27+5:302021-06-27T04:07:27+5:30

काेंढाळी : चाेरट्याने खिडकीतून घरात प्रवेश करीत राेख रक्कम आणि तीन माेबाईल हॅण्डसेट असा एकूण ८,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल ...

Mobile lamps with cash | राेख रकमेसह माेबाईल लंपास

राेख रकमेसह माेबाईल लंपास

काेंढाळी : चाेरट्याने खिडकीतून घरात प्रवेश करीत राेख रक्कम आणि तीन माेबाईल हॅण्डसेट असा एकूण ८,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काेंढाळी नजीकच्या दुधाळा येथे शुक्रवारी (दि. २५) मध्यरात्री घडली.

देवीचंद लक्ष्मणराव लोखंडे (४५, रा. दुधाळा, ता. काटाेल) हे साेलार कंपनीमध्ये नाेकरी करीत असल्याने रात्री ११ वाजता कामावर गेले हाेते. पत्नी, मुलगा, मुलगी व पुतण्या घरी झाेपले हाेते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चाेरट्याने घराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. त्याने कपाटातील चार हजार रुपये राेख आणि ४,५०० रुपये किमतीचे तीन माेबाईल हॅण्डसेट असा एकूण ८,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. घरी चाेरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Mobile lamps with cash