सीसीटीव्हीत मोबाईल चाेरी कैद, दाेन चोरट्यांना अटक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:07 IST2021-01-02T04:07:29+5:302021-01-02T04:07:29+5:30
नागपूर : आरक्षणाचे तिकीट खरेदी करीत असलेल्या महिलेचा मोबाईल पळविणाऱ्या दोन आरोपींना लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी ...

सीसीटीव्हीत मोबाईल चाेरी कैद, दाेन चोरट्यांना अटक ()
नागपूर : आरक्षणाचे तिकीट खरेदी करीत असलेल्या महिलेचा मोबाईल पळविणाऱ्या दोन आरोपींना लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहात अटक केली. माेबाईल चाेरीची ही घटना सीसीटीव्ही कैद झाली असून त्याआधारे चाेरट्यांना अटक केली.
मो. अजहर मो. मंजुर अन्सारी (३०) रा. गोडाई, पो. चंद्रा, जि. चक्रा (झारखंड) आणि शाबाज असलम अन्सारी (२०) रा. बलहा जि. चक्रा (झारखंड), अशी आराेपींची नावे आहेत. फिर्यादी आलिया शेख (२७) रा. मुंबई या नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागातील आरक्षण कार्यालयात तिकीट खरेदी करीत होत्या. तिकीट खरेदी करताना त्यांनी आपला मोबाईल काऊंटरवर ठेवला होता. दरम्यान, महिलेची नजर चुकवून आराेपींनी माेबाईल पळविला. मोबाईल चोरी गेल्याचे समजताच महिलेने लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी एक आरोपी साथीदाराच्या मदतीने मोबाईल चोरी करीत असल्याचे दिसला. आरक्षक भूपेंद्र बाथरी याने याची सूचना निरीक्षक आर. एल. मीणा यांनी दिली. त्यानंतर उपनिरीक्षक होतिलाल मीणा, सुरेश डुलगच, मुकेश राठोड, सी. एच. गाढवे, ललित गुर्जर, लोहमार्ग पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पटले, योगेश घुरडे, प्रवीण खवसे यांनी एका आरोपीला आरक्षण कार्यालयातून तर दुसऱ्या आरोपीस कस्तूरचंद पार्क मैदानाजवळून अटक केली.