शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

'मॉब लिंचिंग' ही देशाची परंपरा नाही : सरसंघचालकांनी टोचले कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 00:15 IST

एखाद्या घटनेला ‘मॉब लिंचिंग’सारखी उपमा देऊन संपूर्ण देश व हिंदू समाजाला बदनाम करण्याचादेखील प्रयत्न होतो. हे एकप्रकारचे षङ्यंत्रच आहे. याविरोधात कायद्याचे पालन झालेच पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत म्हणाले.

ठळक मुद्दे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव साजरा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आजकाल समाजातील एका गटाकडून दुसऱ्या समाजाच्या व्यक्तींविरोधात सामूहिक हिंसा करण्याच्या घटना होत आहेत. तशा पाहिल्या तर या घटना एकतर्फी होत नाहीत. काही घटना जाणूनबुजून होतात, तर काहींना अवास्तव स्वरूप देण्यात येते. परंतु कायदाव्यवस्थेच्या मर्यादेचे उल्लंघन करून होणाऱ्या या घटना परस्पर संबंधांना नष्ट करीत आहेत. असली प्रवृत्ती ही आपल्या देशाची परंपरा नाही व संविधानातदेखील ती बसत नाही. कितीही मतभेद असले तरी कायदा व संविधानाच्या मर्यादेच्या आतच राहिले पाहिजे. अशा प्रवृत्तींचे संघाने कधीही समर्थन केलेले नाही व याविरोधात आम्ही उभे आहोत, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मंगळवारी सकाळी रेशीमबाग मैदान येथे संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ‘एचसीएल’चे संस्थापक शिव नाडर हे उपस्थित होते.एखाद्या घटनेला ‘मॉब लिंचिंग’सारखी उपमा देऊन संपूर्ण देश व हिंदू समाजाला बदनाम करण्याचादेखील प्रयत्न होतो. हे एकप्रकारचे षङ्यंत्रच आहे. याविरोधात कायद्याचे पालन झालेच पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.सरसंघचालकांच्या भाषणाअगोदर शस्त्रपूजन करण्यात आले. शिवाय प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले तसेच निरनिराळ्या शारीरिक कवायती सादर केल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री व्ही.के.सिंह, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्यासह हजारो स्वयंसेवक व नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संघाच्या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण करण्यात आले.मोदी सरकारला शाबासकीआपल्या उद्बोधनात सरसंघचालकांनी मोदी सरकारला शाबासकीदेखील दिली. मागील सरकारला परत निवडून आणून देशाच्या जनतेने त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला आहे; सोबतच येणाऱ्या काळासाठी अनेक अपेक्षादेखील व्यक्त केल्या आहेत. या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. देशाच्या सुरक्षेची स्थिती, सैन्यदलाची तयारी, शासनाचे सुरक्षा धोरण व आंतरराष्ट्रीय राजकारणात दाखविलेली कुशलता यामुळे आज जनता आश्वस्त आहे. जनतेची परिपक्व बुद्धी व कृती, देशात जागृत झालेला स्वाभिमान, शासनाचा दृढसंकल्प व वैज्ञानिक सामर्थ्य यामुळे मागील वर्ष संस्मरणीय राहिले, असे प्रतिपादन डॉ. भागवत यांनी केले. सीमा प्रदेशात सुरक्षा रक्षक तसेच चौक्यांची संख्या वाढवावी लागेल. तसेच बेटांच्या सुरक्षेत वाढ व्हायला हवी, असा सल्लादेखील त्यांनी दिला.काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन व्हावेकलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवून दिली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा तसेच सत्तेवर असलेल्यांचे स्वागतच व्हायला हवे. आता ३७० च्या आडून न झालेली कामे पूर्ण होतील तेव्हाच हे पाऊल पूर्ण होईल, असे समजले जाईल. तेथून घालविण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन झाले पाहिजे. तसेच काश्मीर खोºयात रोजगार निर्मितीदेखील व्हावी, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.समरसतेची स्थिती हवी तशी नाहीदरम्यान, सरसंघचालकांनी सामाजिक भेदभावावरदेखील भाष्य केले. समाजात एकात्मता, समता व समरसतेची स्थिती जशी हवी होती, तशी अद्याप नाही. याचा लाभ देशविरोधी तत्त्व घेतात. समाजात भेदभाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत, असेदेखील डॉ.भागवत म्हणाले.आर्थिक मंदीतून निश्चित बाहेर येऊजगातील अर्थव्यवस्थेत आलेली मंदी व अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या आर्थिक स्पर्धेचा फटका भारताला बसतो आहे. मात्र शासनाने या स्थितीतूून बाहेर पडण्यासाठी दीड महिन्यात अनेक पावले उचलली आहेत. या मंदीच्या चक्रातून देश निश्चित बाहेर येईल, असा विश्वास सरसंघचालकांनी व्यक्त केला. अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यासाठी सरकारला भूमिका घ्यावी लागली. मात्र सरकारची लोककल्याणकारी धोरणे व उपक्रम खालच्या पातळीवर प्रभावी पद्धतीने लागू व्हावी, यावर भर देण्याची गरज असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. जगातील प्रचलित मानक अनेक आर्थिक प्रश्नांचा उलगडा करीत नाहीत. त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला देशाच्या मुळांमध्ये जावे लागेल. उपलब्ध स्रोत व जनतेचा विचार करून आर्थिक धोरण तयार करायला हवे.शिक्षण प्रणालीत बदल हवामागील काही वर्षांपासून संघाकडून सातत्याने शिक्षणप्रणालीबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. देशाच्या नागरिकांना गुलाम करणारी ही शिक्षणव्यवस्था आहे. भारतीय दृष्टी डोळ्यासमोर ठेवून शिक्षण प्रणाली तयार करावी लागेल. स्वभाषा, स्वभूषा, स्वसंस्कृती, कालसंगत, सत्यनिष्ठा, कर्तव्यबोध यावर आधारित शिक्षण प्रणाली हवी. अभ्यासक्रमापासून ते शिक्षकांच्या प्रशिक्षणापर्यंत सर्वच बाबींमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले पाहिजे, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.संघ मुस्लीम, ख्रिश्चनविरोधी नाहीज्यांच्यापर्यंत संघ पोहोचलेला नाही, त्यांच्या मनात विविध माध्यमांतून भीती उत्पन्न करण्याचे काम होते. संघाबाबत माहिती नसणारे लोकदेखील अपुऱ्या माहितीअभावी मुक्ताफळे उधळतात.आपले दुष्कर्म लपविण्यासाठी आता तर इम्रान खानदेखील संघविरोधात बोलतो. संघ हिंदू समाजाचे संघटन करो याचा अर्थ संघ मुस्लीम व ख्रिश्चनविरोधी आहे, असा होत नाही. संघाविरोधात विकृत आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न होतो. संघाचे हिंदुत्व हे हिंदूंपुरते मर्यादित नाही. तर भारतीय पूर्वजांचे वंशज असलेले व सर्व विविधतांचा स्वीकार करून एकोप्याने राहणारे सर्वच भारतीय हिंदू आहेत, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघDasaraदसरा