लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी नागपूर सुधार करण्याच्या पूर्व नागपूर कार्यालयातील अधिकारी सुरेश चव्हाण यांना काळे फासले महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे १३ सप्टेंबर २०२३ रोजी नागपुर सुधार प्रन्यासवर पक्षाचे नेते संदीप देशपांडे तसेच मनसे नेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थिती मोर्चा काढून तत्कालीन सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आलेले होते.
यावेळी भ्रष्ट अधिकारी सुरेश चव्हाण या अधिकाऱ्यास नागपूर सुधार प्रन्यासच्या विभागीय कार्यालय (पूर्व) येथे सलग १० वर्ष सेवेत ठेवले गेले. परंतु या अधिकाऱ्याची यादरम्यान एकदाही बदली करण्यात आली नाही त्यामुळेच यांनी मोठया प्रमाणात अनेक गैरव्यवहार केलेत, मौजा- चिखली (देव) येथील खसरा क्रं. ८३,८४/१ या नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीच्या भूखंडावर अनाधिकृतपणे बसलेल्या अतिक्रमणकारी यांच्याकडून अवैधरीत्या भूखंड वाटप करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले , शासनाद्वारे वाटप केलेल्या विकास निधी अंतर्गत मध्य नागपुरातील भानखेडा येथील सिमेंट रस्त्याची विकास कामे न-करता व महानगरपालिके तर्फे केलेली विकास कामे दर्शवून खोटी बिल तयार करून स्वतःचे तसेच कंत्राटदार मिळून शासनाची फसवणूक केली,मौजा-कळमना, खसरा क्रमांक.२३,२८/१ क येथील भूखंड क्रं.१९,२०,२१,२२,२३,२४ या भूखंडधारकाकडून रुपये १२ लाख वसूल करून खोटी आर.एल व खोटी बांधकाम मंजुरी पत्र दिली गेली,मौजा-भांडेवाडी येथील नासुप्र ने विकासकामामधील अनियमितता, न-केलेल्या कामाची खोटी बिले बनवून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून स्वतःचा व कंत्राटदार याचा आर्थिक फायदा करून घेण्याकरीता ज्या कंत्राट दारासोबत साठगाठ करण्यात आली होती त्या कंत्राटदाराकडून स्वतःच्या साळीच्या नावे मौजा-नारा, खसरा क्रमांक.१४८/२, भूखंड क्रमांक ११८ व ११९ अनेक विषयात आर्थिक लाभ करून देण्याच्या मोबदल्यात भूखंड घेतले.
शासकीय सेवेत असतांना ६ ते ७ वर्षाच्या कालावधीत करोडो रुपयांची चल-अचल संपत्ती गोळा केली,मौजा-चिखली (देव) येथील नासुप्रच्या मालकीच्या औद्योगिक वापराच्या भूखंड धारकांना अनेक खोट्या नोटीस देऊन लाखो रुपये वसूल केले तसेच अनेक केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे या वेळी देण्यात आलेले होते. त्याची या संदर्भात चौकशी सुरू आहे. त्यानंतरही चव्हाण यांना या कार्यालयात परत पाठवण्यात पाठवण्यात आल्याने लोकांमध्ये प्रचंड रोष असल्याने आजचे आंदोलन झाल्याची माहिती मनसेचे नेते उमेश उतखेडे यांनी दिली.