शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

आमदार बच्चू कडू यांना धमकी देणाऱ्यावर नागपुरात हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:33 AM

आमदार बच्चू कडू यांना फोनवर धमकी देणाऱ्या  अमरावती येथील मनसेचा जिल्हा अध्यक्ष संतोष बद्रे याच्यावर मंगळवारी सायंकाळी लोकमत चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपी बद्रे याच्या अपहरणाच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी एक किलोमीटर अंतरावर थांबविले. पोलिसांनी आरोपींकडून बद्रे यांची सुटका केली तर तुषार पुंडकर नावाच्या व्यक्तीला रंगेहात पकडले.

ठळक मुद्देलोकमत चौकात घडली घटनाधमकी देणारा मनसेच्या जिल्हाध्यक्षत्याच्याही अपहरणाचा प्रयत्न फसला

आॅनलाईन लोकमतनागपूर : आमदार बच्चू कडू यांना फोनवर धमकी देणाऱ्या  अमरावती येथील मनसेचा जिल्हा अध्यक्ष संतोष बद्रे याच्यावर मंगळवारी सायंकाळी लोकमत चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपी बद्रे याच्या अपहरणाच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी एक किलोमीटर अंतरावर थांबविले. पोलिसांनी आरोपींकडून बद्रे यांची सुटका केली तर तुषार पुंडकर नावाच्या व्यक्तीला रंगेहात पकडले. अत्यंत व्यस्त लोकमत चौकात घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ माजली आहे. धंतोली पोलीस रात्री उशिरापर्यंत तुषारचे साथीदार किशोर देशमुख, अभिनाश गायसुंदर, सय्यद अली ऊर्फ गव्हर्नर तसेच निखील गावंडे याचा शोध घेत होती.आमदार बच्चू कडू यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे संतोष बद्रे संतापले होते. त्याने दोन दिवसापूर्वी आमदार कडू यांना फोनवरून धमकाविले होते. दोन दिवसांपासून बद्रे याने दिलेल्या धमकीची आॅडिओ क्लिपिंग व्हायरल झाली होती. बद्रेचा मित्र व मनसेचा कार्यकर्ता दीपक वैद्य यांच्या पत्नीला उपचारासाठी धंतोली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दीपकसोबत बद्रे हे सोमवारी नागपुरात आले. सूत्रानुसार तुषार पुंडकर हा बच्चू कडू यांच्या जवळचा असल्याची माहिती आहे. आरोपी व बद्रे यांच्यात चर्चाही झाली होती. आरोपींनी बद्रे याला अमरावतीमध्ये येऊन बच्चू कडू यांची माफी मागण्यास सांगितले होते. परंतु चर्चेत काहीच समाधान निघाले नाही.मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास बद्रे आपल्या दोन मित्रांसोबत बाईकवर धंतोली उद्यानाकडून लोकमत चौकाकडे जात होते. दरम्यान आरोपी बोलेरो वाहनातून आले, बद्रेच्या दुचाकीला ओव्हरटेक करून गाडी थांबविली. त्यांनी बद्रेवर हल्ला केला. काठी आणि लोखंडी सळाखीने मारहाण केली. बद्रेने स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत असलेले मित्र पळून गेले. रस्त्यावरून जाणाºया एका युवकाने बद्रे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी त्याला दूर होण्यास सांगितले. मारहाणीनंतर बद्रेच्या तोंडाला कापड बांधून त्यांना बोलेरोमध्ये कोंबले व तेथून पसार झाले. घटनेच्या वेळी लोकमत चौकात चांगलीच वर्दळ होती. परंतु हल्लेखोरांना थांबविण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही.लोकमत चौकात पोलिसांचे वाहन उभे होते. त्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनीही आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला नाही. हल्लेखोरांनी बद्रेला गाडीत कोंबल्यानंतर पोलीस कर्मचारी तेथे पोहचले. त्यांनी सहकाºयांना सूचना दिली. दरम्यान अमरावती मार्गावर गस्तीवर तैनात असलेल्या पोलीस पथलाला अलर्ट करण्यात आले. पोलिसांनी कृपलानी चौकात बोलेरोला थांबविले. पोलिसांना बघून हल्लेखोर पसार झाले. यातील तुषार पुंडकर हा पोलिसांच्या हाती लागला. बद्रे जखमी अवस्थेत गाडीत बसले होते. तुषारला ताब्यात घेऊन बद्रेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकरण राजकीय असल्याने पोलीस प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करीत आहेत. गुन्हे शाखा व धंतोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन बद्रे यांची विचारपूस केली आहे. तुषारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना अन्य हल्लेखोरांची माहिती मिळाली आहे.बद्रे यांच्यावरील हल्ला हा सुनियोजित होता. काही हल्लेखोर बोलेरोतून तर काही दुचाकीने आणि पायीसुद्धा होते. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेची पोलखोल झाली आहे. आरोपी बद्रेला धडा शिकविण्यासाठी सकाळीच नागपुरात आले होते. ते संधीच्या शोधात होते. अमरावतीला परततानाच बद्रेला धडा शिकविण्याचा त्यांचा इरादा होता. बद्रे यांचा अमरावतीत आॅनलाईन लॉटरी व प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय आहे. सिनेमा स्टाईलमध्ये केला हल्लाहल्लेखोरांनी सिनेमा स्टाईलमध्ये बद्रेवर हल्ला केला. लोकमत चौकात ही घटना घडत असताना पळापळ झाली होती. घटनेनंतर अर्धा तास दुचाकी घटनास्थळावरच पडून होती. घटनास्थळावरील पोलीस कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षामुळे हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.पोलिसांवर दबावसूत्रानुसार बद्रेवर झालेल्या हल्ल्यात राजकीय क्षेत्रात प्रभावी लोक सहभागी आहेत. त्यांच्या इशाºयावरच आरोपींनी हल्ला केला आहे. पोलिसांनाही याची माहिती आहे. मुन्ना यादव प्रकरणात धंतोली पोलिसांची चांगलीच फजिती होत आहे. या प्रकरणातही पोलीस संयम ठेवून आहेत.मी कार्यकर्त्यांना आवरण्याचा बराच प्रयत्न केला तरीही काही कार्यकर्ते परस्पर संतोष बद्रेच्या मागावर गेले. त्याला चोख उत्तर दिले. मनसेने अशा चारित्र्यहीन लोकांना दूर ठेवायला हवे. माझ्या प्रेमापोटी हे पाऊल उचलणाऱ्या  कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे.- बच्चू कडू

अपक्ष आमदार, अचलपूर

 

 

 

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा