शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी वजन वापरून जि.प.सदस्यांचा अर्धा निधी पळविला; नागरी सुविधांच्या कामांना कात्री

By गणेश हुड | Updated: September 5, 2023 15:16 IST

विरोधामुळे तूर्त नियोजन समितीच्या सदस्यांना प्रतिक्षा

नागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) विकास कामांच्या आराखड्यात जनसुविधा व नागरीसुविधा अंतर्गत ५३ कोटींचा निधी मंजूर आहे. हा संपूर्ण निधी जिल्हा परिषदेच्या ५८ सदस्यांना मिळणे अपेक्षित होते. मात्र सत्तापक्षाच्या आमदारांनी वजन वापरून यातील १७ कोटींचा निधी पळविला आहे.  

जिल्हा परिषद सदस्यांनी  सुचविलेली कामे रद्द करून हा निधी आाम्हाला देण्यात यावा, यासाठी आमदारांनी प्रस्ताव दिला होता. दबावामुळे  जि.प. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याची तयारी चालविली होती. परंतु जि.प.सदस्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतल्याने जनसुविधा व नागरीसुविधांच्या ५२ कोटींच्या निधीपैकी ३५ कोटी जि.प.सदस्यांना मिळणार आहे. तर उर्वरित १७ कोटींचा निधी आमदारांना जाणार आहे. जनसुविधा व नागरी सुविधांचा निधी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळपर्यत जि.प.सदस्यांना मिळत होता. परंतु  आता यात आमदार वाटेकरी झाल्याने सदस्यांच्या सर्कलमधील नागरी सुविधांच्या कामांना कात्री लागणार आहे.                                                                                                                                                                       विरोधामुळे कोट्यवधीचे प्रस्ताव थांबले

काही आमदारांनी ५ ते ६ कोटींच्या निधीचे प्रस्ताव जि.प.च्या पंचायत विभागाकडे पाठविले आहेत.  प्रस्ताव मंजुरीसाठी दबाव आल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. आमदारांचे सर्व प्रस्ताव मंजूर केल्यास जि.प.कडून या प्रस्तावांना मंजुरी मिळणार नाही. सभागृहात याचा विरोध करू अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने प्रशासनाने यावर ३५-१७ असा तोडगा काढला. ३५ कोटी सदस्यांना तर १७ कोटी आमदारांना देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमदारांना निधी द्यावयाचा असेल तर जनसुविधा व नागरीसुविधांचा निधी वाढवून द्यावा. अशी मागणी सदस्यांनी केली होती. मात्र ती मान्य करण्यात आलेली नाही. यामुळे सदस्यांत नाराजी आहे.  नियोजन समितीच्या सदस्यांनीही निधीसाठी प्रस्ताव दिले आहेत. कुणी अडीच कोटीचे तर कुणाचे तीन कोटींचे प्रस्ताव आहे. मात्र जि.प.सदस्यांचा विरोध विचारात घेता तूर्त समितीच्या सदस्यांचे प्रस्ताव थांबविल्याची माहिती आहे. 

रस्ते, गटारे, नाल्यांची कामे रखडणार

जनसुविधांच्या निधीतून ग्रामीण भागातील रस्ते, नाल्या, गटारे, स्मशानभूमी अशी आवश्यक कामे केली जातात. तर पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावात नागरी सुविधांच्या निधीतून ही कामे केली जातात. जि.प.सदस्यांनी या कामांचे प्रस्ताव दिले आहेत. मात्र मागणीनुसार निधी मिळणार नसल्याने  प्रस्तावित  रस्ते, नाल्या, गटारे, स्मशानभूमींची  काही कामे रखडणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर