शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच निधी देतात; आमदार आशिष जयस्वालांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 18:19 IST

आमदार आशिष जयस्वाल यांनी निधी वाटपावरून पुन्हा एकदा नाराजीचा सूर आवळला आहे.

ठळक मुद्देआशिष जयस्वाल यांनी पुन्हा ठेवले मंत्र्यांच्या टक्केवारीवर बोट

नागपूर : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. आशिष जयस्वाल यांनी पुन्हा एकदा मंत्र्यांच्या टक्केवारीवर बोट ठेवत नाराजीचा सूर आवळला आहे. अनेक मंत्री आमदारांपासून मतदारसंघाच्या कामातून देखील पैशाची अपेक्षा ठेवतात. मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच काही मंत्री निधी देतात. वेगवेगळ्या पद्धतीने तो निधी घेण्याचा प्रयत्न करतात, असा खळबळजनक आरोप पुन्हा आशिष जयस्वाल यांनी सोमवारी केला.

आ. जयस्वाल म्हणाले, काही मंत्री चुकीच्या पद्धतीने वागत आहेत. त्यांना असे वाटत आहे की मीच सर्वेसर्वा झालो आहे. मीच या निधीचा मालक आहे. अशांची मंत्रिमंडळातूनच हकालपट्टी केली पाहिजे. आमदारांना सांभाळण्याची मंत्र्यांची जबाबदारी आहे. मी शिवसैनिक आहे. महाविकास आघाडी सोबत आहे. त्यामुळे राज्यसभा व विधान परिषदेची निवडणूक झाल्यावर मी माझी लढाई सुरू ठेवीन.

...तर सरकारला दुष्परिणाम भोगावे लागतील

निधी वाटपावरून आमदारांची नाराजी कायम आहे. निधी वाटपाचा असमतोल सहन करणार नाही. जे मंत्री आमदारांना मोजत नाही, किंमत देत नाही, जर आमदारांचे प्रश्न सुटले नाही, न्याय मिळाला नाही, तर आम्ही सहन करणार नाही. याचा उद्रेक होईल. याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा जयस्वाल यांनी दिला.

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Jaiswalआशीष जयस्वालnagpurनागपूरfundsनिधीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी