‘एमकेसीएल’चे महाआयटी जिनियस,महाजागृती अभियान व ई-टेस्ट स्पर्धा

By Admin | Updated: December 19, 2015 02:46 IST2015-12-19T02:46:59+5:302015-12-19T02:46:59+5:30

‘एमकेसीएल’ने १४ व्या वर्धापनदिनानिमित्त शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांसाठी आयोजित महाआयटी..

MKCL's Mahatyiti Gianyas, Mahajagruti Abhiyan and e-Test Competitions | ‘एमकेसीएल’चे महाआयटी जिनियस,महाजागृती अभियान व ई-टेस्ट स्पर्धा

‘एमकेसीएल’चे महाआयटी जिनियस,महाजागृती अभियान व ई-टेस्ट स्पर्धा

व्हाईस टायपिंग व सायबर सुरक्षा : डिजिटल फ्री लान्सिंग
नागपूर : ‘एमकेसीएल’ने १४ व्या वर्धापनदिनानिमित्त शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांसाठी आयोजित महाआयटी जिनियस या टेस्टमध्ये विजयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर २५ लाखांची पारितोषिके दिल्याची माहिती ‘एमकेसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
यामध्ये एकूण २३ विषयांच्या उदा. वर्ड, फोटोशॉप, स्क्रॅच अशा ई-टेस्टमध्ये महाराष्ट्रातून २ लाख ६० हजारांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदविला होता. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सामाजिक विषयांवर युवांमध्ये जागृती आणण्यासाठी ‘महाजागृती अभियान’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आपल्या परिसरातील दुष्काळग्रस्तांना प्रत्यक्ष मदत करता यावी यासाठी अभिनव प्रश्नमंजुषेचा प्रयोग अमलात आणला गेला. यामध्ये स्वच्छ भारत, पर्यावरण संवर्धन, दुष्काळ निर्मूलन, भारतीय संविधान, बेटी बचाव, बेटी पढाव या पाच विषयांवर ई-टेस्ट घेण्यात आली. या स्पर्धेसाठी एकूण १० लाख रुपयांची पारितोषिके एमकेसीएलतर्फे विजयी विद्यार्थ्यांना दिली जातील. या ई-टेस्टमध्ये महाराष्ट्रातून १ लाख ८७ हजाराहून अधिक लोकांनी सहभाग नोंदविल्याचे सावंत यांनी सांगितले.
सायबर सुरक्षेचे तंत्र शिकविणार
सावंत म्हणाले, १ जानेवारी २०१६ पासून ‘एमकेसीएल’च्या पाच हजार केंद्रावर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत व्हाईस टायपिंगचे तंत्र शिकविणार आहे. याची ५०० शिक्षकांना माहिती देण्यात येईल. तसेच सायबर सुरक्षेचे तंत्र शिकविण्यात येणार आहे. याशिवाय क्लिक कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल फ्री लान्सिंग कोर्स आहे. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी फायदा होईल. यासाठी इजी पोर्टल तयार केले आहे. याशिवाय मास्टरिंग सिरीज सुरू केली आहे.
पत्रपरिषदेत एमकेसीएलचे विभागीय समन्वयक शशीकांत देशपांडे उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: MKCL's Mahatyiti Gianyas, Mahajagruti Abhiyan and e-Test Competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.