प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या निधीत गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST2021-03-26T04:08:54+5:302021-03-26T04:08:54+5:30

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध विकास कामांसाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या निधीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार ...

Misuse of funds in Pradhan Mantri Mineral Sector Welfare Scheme | प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या निधीत गैरव्यवहार

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या निधीत गैरव्यवहार

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध विकास कामांसाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या निधीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला असा आरोप चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाला केली आहे.

खणीकर्मामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रात विविध विकासकामे करण्यासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना लागू करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या आदेशावरून संबंधित जिल्ह्यांमध्ये डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन ट्रस्टने या योजनेंतर्गत विविध गावांमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी मनमानी व अवैध पद्धतीने निधी मंजूर केला आहे. निधी मंजूर करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. राजकीय प्रभावाखाली व पक्षपात करून निधी देण्यात आला असे भांगडिया यांचे म्हणणे आहे.

----------------

जनहित याचिका दाखल करा

या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने हा जनहिताचा मुद्दा असल्याचे नमूद करून भांगडिया यांना याविषयी जनहित याचिका दाखल करण्यास सांगितले. भांगडिया यांच्यातर्फे ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Misuse of funds in Pradhan Mantri Mineral Sector Welfare Scheme