चीनचे मिशन मिहान

By Admin | Updated: March 26, 2015 02:24 IST2015-03-26T02:24:58+5:302015-03-26T02:24:58+5:30

चीनचे वाणिज्य दूत जिंग जियांग गुरुवार, २६ रोजी उद्योजकांसोबत दोन दिवसीय दौऱ्यावर...

Mission of China | चीनचे मिशन मिहान

चीनचे मिशन मिहान

नागपूर : चीनचे वाणिज्य दूत जिंग जियांग गुरुवार, २६ रोजी उद्योजकांसोबत दोन दिवसीय दौऱ्यावर नागपुरात येत असून २७ रोजी मिहानचा दौरा करतील.
पहिल्या दिवशी नागपूरची पाहणी करणार आहे. शनिवार, २७ रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) अधिकाऱ्यांसोबत विस्तृत चर्चा करणार आहे. यापूर्वी सिंगापूरचे वाणिज्य दूत हेसुद्धा मिहानची पाहणी करणार होते, पण सिंगापूरचे प्रथम पंतप्रधान ली क्वान यू यांच्या निधनामुळे त्यांनी दौरा रद्द केला होता. पण ते पुढील आठवड्यात दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
नागपुरात मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनानंतर विदेशी कंपन्या आता मिहानमध्ये गुंतवणुकीच्या संधी आणि पर्याय शोधत आहेत. पुढील काही दिवसात नेदरलँड आणि स्वित्झर्लंण्डचे उद्योजक मिहानला भेट देणार असून फ्रान्सचे अधिकारी गुरुवार, २५ रोजी मिहानचे निरीक्षण करणार आहेत.

Web Title: Mission of China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.