शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

मिशन विधानसभा

By admin | Updated: September 13, 2014 02:37 IST

गणेश विसर्जनानंतर निवडणुकीची घोषणा केली जाईल असा अंदाज असल्याने मंगळवारपासूनच निवडणुकांच्या घोषणेकडे राजकीय पक्ष, प्रशासन आणि सर्वसामान्यांचेही लक्ष लागले होते.

गणेश विसर्जनानंतर निवडणुकीची घोषणा केली जाईल असा अंदाज असल्याने मंगळवारपासूनच निवडणुकांच्या घोषणेकडे राजकीय पक्ष, प्रशासन आणि सर्वसामान्यांचेही लक्ष लागले होते. तीन दिवस उलटल्यावरही घोषणा न झाल्याने तर्कवितर्क लावण्यात येत होते. अखेर शुक्रवारी आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आता निवडणुकीसाठी काम करणाऱ्या सर्व यंत्रणा सायंकाळपासूनच कामाला लागल्या आहेत.मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्याच प्रमाणे नवीन नोंदणीही सुरू आहे. निवडणूक यंत्रे मागवण्यात आली असून त्याची तपासणी आणि मॉक ड्रिलचेही काम पूर्ण झाले आहे. बिघाड झालेली यंत्रे दुरुस्त करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सांगण्यात आले आहे. नोडल अधिकारी, संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहितेचे पालन होते किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठीही पथक तयार करण्यात आले असून उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक खर्चाचे दरपत्रक तयार करण्यात आले आहे. बाराही मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची यादी तयार आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रत्येक विधानसभेसाठी भरारी पथक, व्हिडीओ शुटिंग करणारे पथक, खर्चाची तपासणी करण्यासाठी लेखा अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. इव्हीएमची तपासणी आणि प्रतिरूप मतदानाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. गाड्यांची व्यवस्था, मतदार नोंदणी आणि तत्सम कामाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)