मिशन विधानसभा

By Admin | Updated: September 13, 2014 02:37 IST2014-09-13T02:37:44+5:302014-09-13T02:37:44+5:30

गणेश विसर्जनानंतर निवडणुकीची घोषणा केली जाईल असा अंदाज असल्याने मंगळवारपासूनच निवडणुकांच्या घोषणेकडे राजकीय पक्ष, प्रशासन आणि सर्वसामान्यांचेही लक्ष लागले होते.

Mission Assembly | मिशन विधानसभा

मिशन विधानसभा

गणेश विसर्जनानंतर निवडणुकीची घोषणा केली जाईल असा अंदाज असल्याने मंगळवारपासूनच निवडणुकांच्या घोषणेकडे राजकीय पक्ष, प्रशासन आणि सर्वसामान्यांचेही लक्ष लागले होते. तीन दिवस उलटल्यावरही घोषणा न झाल्याने तर्कवितर्क लावण्यात येत होते. अखेर शुक्रवारी आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आता निवडणुकीसाठी काम करणाऱ्या सर्व यंत्रणा सायंकाळपासूनच कामाला लागल्या आहेत.
मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्याच प्रमाणे नवीन नोंदणीही सुरू आहे. निवडणूक यंत्रे मागवण्यात आली असून त्याची तपासणी आणि मॉक ड्रिलचेही काम पूर्ण झाले आहे. बिघाड झालेली यंत्रे दुरुस्त करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सांगण्यात आले आहे. नोडल अधिकारी, संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहितेचे पालन होते किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठीही पथक तयार करण्यात आले असून उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक खर्चाचे दरपत्रक तयार करण्यात आले आहे. बाराही मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची यादी तयार आहे.
आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रत्येक विधानसभेसाठी भरारी पथक, व्हिडीओ शुटिंग करणारे पथक, खर्चाची तपासणी करण्यासाठी लेखा अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
इव्हीएमची तपासणी आणि प्रतिरूप मतदानाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. गाड्यांची व्यवस्था, मतदार नोंदणी आणि तत्सम कामाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mission Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.