शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

नागपुरात ठाणा मालखाना प्रभारीकडून १६ लाखाचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:31 PM

सक्करदरा पोलीस ठाण्याच्या मालखाना प्रभारीने १६ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील हवालदार रामचंद्र टाकळखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देसक्करदऱ्यात गुन्हा दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या मालखाना प्रभारीने १६ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील हवालदार रामचंद्र टाकळखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. टाकळखेडे २०१२ पासून ठाण्यात मालखाना प्रभारी होते. ते ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे त्यांचा कार्यभार सोपविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, टाकळखेडे यांच्याद्वारे मालखान्यात अपहार केल्याची माहिती पुढे आली. टाकळखेडेने जप्त केलेल्या दागिन्यांची हेराफेरी केली. मूळ दागिन्यांच्या बदली बनावट दागिने ठेवले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी टाकळखेडेला चांगलेच सुनावले. त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यावरच गुन्हा दाखल झाल्याने सक्करदरा ठाण्यात खळबळ माजली. ठाण्यातील मालखाने हे नेहमीच चर्चेत असतात.

टॅग्स :fraudधोकेबाजीPolice Stationपोलीस ठाणे