‘मिस विकी डोनर’ हिट
By Admin | Updated: June 7, 2015 03:07 IST2015-06-07T03:07:15+5:302015-06-07T03:07:15+5:30
स्त्री-पुरु षांच्या संबंधाशिवाय मूल जन्माला येणे ही बाब अशक्य वाटत असली तरी ती शक्य झाली आहे.

‘मिस विकी डोनर’ हिट
‘एग डोनेशन’साठी तरुणींकडून विचारणा
सुमेध वाघमारे नागपूर
स्त्री-पुरु षांच्या संबंधाशिवाय मूल जन्माला येणे ही बाब अशक्य वाटत असली तरी ती शक्य झाली आहे. ‘स्पर्म डोनर’सोबतच आता ‘एग डोनर’च्या माध्यमातून गर्भधारणा करणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरत आहे. विशेष म्हणजे, सरोगसीपेक्षा सोपा आणि लवकर पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून हल्ली तरुणी ‘एग डोनेशन’कडे वळलेल्या आहेत. परिणामी, ‘विकी डोनर’ चित्रपटामुळे चर्चेत आलेले ‘स्पर्म डोनेशन’च्या तुलनेत ‘एग डोनेशन’ हिट ठरत आहे. तरुणींकडून यासंदर्भात इस्पितळात विचारणा होत आहे.
बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाचे (इन्फर्टिलिटी) प्रमाण वाढत चालले आहे. दिवसेंदिवस यात वाढच होत आहे. भारतामध्ये १८ ते ३५ वयोगटातील १० टक्के दाम्पत्यांमध्ये वंध्यत्व आढळते. ताणतणाव, लठ्ठपणा, शहरी जीवनपद्धती, व्यसनाधिनता, व्यावसायिक बंधने यामुळे वंध्यत्व दिसते. अनेकदा करिअर, उच्च राहणीमान मिळविण्याच्या धावपळीत वय वाढत जाते आणि नंतर दाम्पत्य डॉक्टरांकडे धाव घेतात.
मुले होत नाहीत, म्हणून बऱ्याचदा स्त्रीला दोषी ठरवले जाते. पण योग्य समुपदेशन व तंत्रज्ञानामुळे याचा फायदा दाम्पत्याला होत असल्याचे चित्र आहे. यात ‘एग डोनर’ची मागणीसुद्धा वाढत चालली आहे. एग डोनेशनच्या पूर्ण प्रक्रि येला किमान १५ दिवस लागतात. या दिवसांत रोज एक इंजक्शन दिलं जातं. त्यासाठी प्रति दिवस ठरलेली रक्कम देऊ केली जाते.
स्त्रीबीज देणे गुन्हा नाही
नियमानुसार स्त्रीबीज देणे हा गुन्हा नाही. मात्र, ते कुणी द्यायला हवे याचे काही नियम आहेत. वर्षातून कमीतकमी तीन वेळा स्त्रीबीज देता येते. २१ ते ३५ वयोगटातील स्त्री, विवाहित महिला स्त्रीबीज दान करू शकते. तिला स्वत:चं एक मुल असणं गरजेचं आहे. ती शिकलेली असावी. व्यंग नसावे.
‘एग डोनेशन प्रोग्राम’
प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी सांगितले, स्त्रीबीज दान करणाऱ्या महिलेला संपूर्ण ‘एग डोनेशन प्रोग्राम’ची माहिती दिली जाते. पहिल्या टप्प्यात तिची रक्ताची चाचणी आणि सोनोग्राफी केली जाते. त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट करून तिला कोणताही आजार नसल्याची खात्री करवून घेतली जाते. या प्रकियेत मासिकपाळी येण्यापूर्वी स्त्रीबीजाची संख्या वाढविणारे हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जातात. त्यानंतर पुढील महिन्यात येणाऱ्या मासिकपाळीच्या चौथ्या दिवशी स्त्रीबीज काढून टाकण्यात येतं. याला किमान १५ दिवस लागतात.