‘मिस कॉल’ ने केला घात

By Admin | Updated: July 14, 2015 02:47 IST2015-07-14T02:47:16+5:302015-07-14T02:47:16+5:30

मिस कॉल का दिला, अशी विचारणा करणे एका तरुणासाठी घातक ठरले. मिस कॉल देणाऱ्या गुंडाने त्या तरुणावर

'Miss Call' has struck | ‘मिस कॉल’ ने केला घात

‘मिस कॉल’ ने केला घात

नागपूर : मिस कॉल का दिला, अशी विचारणा करणे एका तरुणासाठी घातक ठरले. मिस कॉल देणाऱ्या गुंडाने त्या तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. दामोदर उत्तमजी चौधरी (वय २२) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

मूळचा सडक अर्जुनी (जि. गोंदिया) येथील रहिवासी असलेला दामोदर सध्या नंदनवनमधील शिक्षक कॉलनीतील राऊत नगरात तुकाराम ठाकरे यांचे घरी राहातो. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास त्याच्या मोबाईलवर मिस कॉल आला. त्यामुळे दामोदरने त्या नंबरवर फोन करून पलीकडून बोलणाऱ्याची चौकशी केली. पलीकडून कुख्यात गुंड सद्दाम हाफीज बेग (वय २२, रा. राऊतनगर) बोलत होता. त्याने दामोदरसोबत वाद घालत शिवीगाळ सुरू केली. एवढेच नव्हे तर ‘तू कुठे आहे‘, अशी विचारणा केली. तावातावात दामोदरने त्याला शिक्षक कॉलनीतील चौकात पानटपरीवर असल्याचे सांगितले. काही वेळेतच सद्दाम तलवार घेऊन तेथे आला आणि त्याने दामोदरवर प्राणघातक हल्ला चढवला. आरोपीने मानेवर केलेला वार दामोदरने हातावर झेलला. त्यामुळे तो बचावला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. माहिती कळताच पीएसआय ठाकूर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. त्यांनी दामोदरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Miss Call' has struck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.