अल्पवयीन मुलीला पळवून नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST2021-01-17T04:08:02+5:302021-01-17T04:08:02+5:30
गिट्टीखदानमधील १६ वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारी ३ वाजता मैत्रिणीकडे गेली होती. तेथून तिला एका व्यक्तीने जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवून ...

अल्पवयीन मुलीला पळवून नेले
गिट्टीखदानमधील १६ वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारी ३ वाजता मैत्रिणीकडे गेली होती. तेथून तिला एका व्यक्तीने जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवून पळवून नेले. सायंकाळ झाली तरी ती घरी परत आली नाही. त्यामुळे चिंताग्रस्त पालकांनी शोधाशोध केली असता, तिला ज्युपिटरवरून एका व्यक्तीने पळवून नेल्याची माहिती पुढे आली. पालकाच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता मुलीसोबतच तिला पळवून नेणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.
अशाच प्रकारे अजनीतील १६ वर्षीय मुलगी गुरुवारी रात्री ९ वाजता पासून बेपत्ता झाली. भाजीपाला आणि किराणा आणण्याच्या बहाण्याने ती घरून गेली होती. परत न आल्याने पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे.
----