अल्पवयीन मुलीला पळवून नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:05+5:302021-01-03T04:11:05+5:30
--- आंध्र प्रदेशातील वृद्धाचा मृत्यू नागपूर : गोपालपेठ मंडल मेहबूबनगर (आंध्र प्रदेश) येथील मूळ रहिवासी पीआनंद पी. बालास्वामी (वय ...

अल्पवयीन मुलीला पळवून नेले
---
आंध्र प्रदेशातील वृद्धाचा मृत्यू
नागपूर : गोपालपेठ मंडल मेहबूबनगर (आंध्र प्रदेश) येथील मूळ रहिवासी पीआनंद पी. बालास्वामी (वय अंदाजे ७० वर्षे) यांचा मृतदेह मध्यवर्ती बसस्थानकाच्या फलाटावर आढळला. मुरलीधर रामदास भालेकर (वय ४८) यांनी शनिवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना ही माहिती कळविली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---
अमरावती जिल्ह्यातील तरुणाचा मृत्यू
नागपूर : अमरावती जिल्ह्यातील रामा साबुरगाव (ता. भातकुली) येथील रहिवासी पवनकुमार विजय अढाऊ (वय ३३) हे शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास मेडिकल चौक परिसरात मृतावस्थेत आढळले. संदीप सतीश देशमुख (रा. वाघदरा, इसासनी) यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----
दोघांनी लावला गळफास
नागपूर : तहसील आणि यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. प्रणय जागेश्वर नंदेश्वर (वय ३०) भानखेड्यातील तरुणाने गळफास लावून घेतला. शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली ते उघड झाले नाही. तहसील पोलीस चौकशी करीत आहेत. पिवळी नदी धम्मानंदनगर येथील गणेश पार्कजवळ राहणारा नरेंद्र माणिकराव बेलेकर (वय ३२) याने शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास गळफास लावून घेतला.
महानंदा युवराज मानकर (वय ४९) यांनी दिलेल्या माहितीवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----
जाळून घेत आत्महत्या
नागपूर : जरीपटक्यातील भीम चौकाजवळ राहणारे किसनचंद खेलदास अंगवानी (वय ५२) यांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली. अंगवानी यांनी २८ डिसेंबरच्या दुपारी स्वत:ला पेटवून घेतले. गंभीर अवस्थेत त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांना डॉक्टरांनी ३० डिसेंबरला मृत घोषित केले. ललित किशनचंद अंगवानी (वय २७) यांनी दिलेल्या माहितीवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----