Minor girl rushes to High Court for abortion: Rape victim | अल्पवयीन मुलीची गर्भपातासाठी हायकोर्टात धाव :  बलात्कार पीडित

अल्पवयीन मुलीची गर्भपातासाठी हायकोर्टात धाव :  बलात्कार पीडित

ठळक मुद्देवैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : वडिलाच्या मित्राने बलात्कार केल्यामुळे गर्भधारणा झालेल्या अल्पवयीन मुलीने गर्भपाताची परवानगी मिळण्यासाठी मुुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. मुलगी २३ आठवड्याची गर्भवती आहे.
उच्च न्यायालयाने गुरुवारी प्रकरण ऐकल्यानंतर मुलीच्या आवश्यक तपासण्या करण्यासाठी पाच डॉक्टर्सचे वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिला. या मंडळात गायनॉकॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, कॉर्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट व पॅथॉलॉजिस्टचा समावेश असणे आवश्यक आहे. तसेच, मंडळ सदस्यांमध्ये दोन महिला डॉक्टर असाव्यात असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.
पीडित मुलीला ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मंडळापुढे हजर करावे. मंडळाने तिच्या आवश्यक तपासण्या करून ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजतापूर्वी अहवाल सादर करावा, असेही न्यायालयाने सांगितले. प्रकरणावर न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे. पीडित मुलीतर्फे अ‍ॅड. स्विटी भाटिया यांनी कामकाज पाहिले..

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पीडित मुलगी चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव येथील असून ती १२ वर्षे ४ महिने वयाची आहे. तिच्या वडिलाचा मित्र आरोपी योगेश रामचंद्र दोहतारे याने तिच्यावर बलात्कार केला अशी तक्रार १४ मार्च २०२० रोजी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Minor girl rushes to High Court for abortion: Rape victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.