लग्नाचे आमिष दाखवून नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 14:43 IST2017-11-17T14:39:58+5:302017-11-17T14:43:16+5:30
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत दोन वर्षांत अनेकदा शरीरसंबंध जोडणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

लग्नाचे आमिष दाखवून नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
आॅनलाईन लोकमत
नागपूर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत दोन वर्षांत अनेकदा शरीरसंबंध जोडणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पवन अरु ण कडू (वय २०) असे आरोपीचे नाव आहे.
पवन कळमन्यातील भवानीनगरात गणेश मंदीरजवळ राहतो. तो एमबीएच्या प्रथम वर्षाला शिकतो आहे. खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका मुलीसोबत (वय १७) त्याचे दोन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शरीरसंबंध जोडू लागला. दोन वर्षांनंतर आता मात्र तो तिला टाळू लागला. त्याचे दुसरीकडे सूत जुळल्याच्या संशयामुळे पिडितेचा त्याच्यासोबत वाद होऊ लागला. अखेर तिने त्याला लग्नासाठी विचाले असता त्याने नकार दिला. त्यामुळे पिडितेने गुरु वारी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून पवन कडूला अटक केली आहे.