अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: July 20, 2015 03:04 IST2015-07-20T03:04:23+5:302015-07-20T03:04:23+5:30

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे पुन्हा एक प्रकरण उघडकीस आले आहे.

Minor girl raped | अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नागपूर : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे पुन्हा एक प्रकरण उघडकीस आले आहे. सुमित बागडे (३०), अशोक खोब्रागडे (३५) व १६ वर्षीय मुलगा अशी आरोपीची नावे आहेत.
गेल्या सात दिवसात या प्रकारची ही सहावी घटना आहे. यात चार अल्पवयीन विद्यार्थिनी आहेत. त्यामुळे या घटनांमुळे महिलांमध्ये प्रचंड दहशत पसरलेली आहे. इमामवाडा पोलीस ठाणे अंतर्गत राहणारी पीडित १२ वर्षीय विद्यार्थिनी सातव्या वर्गात शिकते. वस्तीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलासोबत तिची मैत्री आहे. तो मुलगा नवव्या वर्गात शिकतो. शुक्रवारी रात्री मुलाने तिला भेटायला बोलाविले. सूत्रांनुसार मुलगी जेव्हा मुलाला भेटायला आली तेव्हा त्याने तिला दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता यायला सांगितले. शनिवारी रात्री १२ वाजता मुलगी त्याला भेटायला आली तेव्हा मुलाच्या घरी भाड्याने राहणारा सुमित आणि त्याचा मित्र अशोक खोब्रागडे होता. सुमित व अशोक हे आॅटो चालक आहेत. त्यांनी मुलीला फिरायला चलण्याचे आमिष दाखविले. मुलगीही तयार झाली. ते तिघेही मुलीला आॅटोने जरीपटक्यातील समतानगरात घेऊन गेले. तिथे एका खोलीत तिच्यावर बलात्कार केला. पहाटे ५.३० वाजता तिला वस्तीत सोडून फरार झाले.
रविवारी सकाळी मुलीची अवस्था पाहून कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी विचारपूस केली तेव्हा खरा प्रकार समोर आला. नातलग तिला घेऊन इमामवाडा पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध बलात्कार, अपहरण आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आदी गुन्हे दाखल केले. सुमित बागडे आणि आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Minor girl raped