अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला १० वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:59 IST2018-12-05T00:58:07+5:302018-12-05T00:59:19+5:30
सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला १० वर्षे कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला.
दीपक ऊर्फ कलवा किसनलाल सोनी (२०) असे आरोपीचे नाव असून तो लकडगंज पोलिसांच्या हद्दीत राहतो. ही घटना ५ मार्च २०१३ रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी केवळ १० वर्षे वयाची होती. मुलगी शाळेत असताना आरोपीने तिला बळजबरीने स्वत:सोबत नेले व तिच्यावर अत्याचार केला. पोलीस तक्रारीनंतर आरोपीला ७ मार्च रोजी अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक आर. डी. उनवणे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. वर्षा आगलावे यांनी बाजू मांडली.