अन्सारनगरातील घटना : अपहरणाचा गुन्हा दाखल नागपूर : अन्सारनगर, मोमिनपुऱ्यातील मोहम्मद हाशमी हा १६ वर्षीय मुलगा तीन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हाशमी आणि त्याची आई २७ जुलैला रात्री ८.३० वाजता गांजाखेत मधील मदरशात पायी गेले होते. परत घरी येताना त्याने मित्राकडून येतो, असे सांगून आईला घरी परत पाठवले. त्यानंतर मध्यरात्र झाली तरी तो परत आला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ फैजीखान याने तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. हाशमीला पळवून नेले असावे, असे तक्रारीत नमूद केले. त्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. हाशमीचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलगा बेपत्ता
By admin | Updated: July 31, 2016 02:23 IST