शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:37 IST

शिक्षण विभागात विविध पातळ्यांवर भ्रष्टाचार झाला असून त्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत आहेत. मंत्रालयातील अधिकारीदेखील यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागपूर : अपात्र व्यक्तीची मुख्याध्यापकपदी नियुक्ती व शालार्थ घोटाळा समोर आल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या विभागात विविध पातळ्यांवर भ्रष्टाचार झाला असून त्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत आहेत. मंत्रालयातील अधिकारीदेखील यात सहभागी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर संघटनेतर्फे लावण्यात आला आहे. संघटनेतर्फे गुरुवारी सदर पोलिस ठाण्यात तक्रार देत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

नागपुरातील सहा शाळांमध्ये बोगस नियुक्ती झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. गोरेवाडा येथील रॉजर स्ट्रॉडस्ट्रेंड हायस्कूल येथील चार शिक्षकांची नियुक्ती बोगस असून त्यात तत्कालीन प्रभारी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांनी नियमबाह्य मान्यता प्रदान केली. तसेच टेकाडे हायस्कूल येथील सहायक शिक्षक शालिक भेडारकर यांचे नाव समायोजन यादीत  करून कुही येथे समायोजन केले, असेही म्हटले आहे.

दुबार शिक्षकांच्या वेतनाचा घोटाळा?

रात्रशाळांतील अर्धवेळ व दुबार मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीचा घोळ शालेय शिक्षण विभागातील मंत्रालयीन कक्ष अधिकारी दत्तात्रेय शिंदे व स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे.  त्यांना आर्थिक देवाणघेवाणीनंतर मान्यता देण्यात येत आहे, असा आरोप संघटनेने केला आहे.

नाशिकमध्ये आणखी गुन्हे दाखल होणार

नाशिक : वेतनाच्या आकड्यात येणारी तफावत आणि अनुदानित वेतनापासून वंचित राहिलेल्या शिक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकमध्ये तब्बल ७९ शिक्षकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर असाच मोठा प्रकार नागपूरमध्ये उघड झाला आहे.

विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानित शिक्षक बनवण्यासाठी काही शिक्षण अधिकाऱ्यांसह काही मुख्याध्यापकांची एक साखळी कार्यरत असल्याचा प्रकार नाशिकमध्ये दोन महिन्यांपूर्वी उघड झाला होता. त्यामध्ये काही संस्थाही सहभागी असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीTeacherशिक्षकEducationशिक्षण