शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांमुळे मंत्रिपदे रखडलेली नाहीत; थ्रोट इन्फेक्शनमुळे होते नॉट रिचेबल

By मंगेश व्यवहारे | Updated: December 18, 2024 12:18 IST

Nagpur : राष्ट्रवादी अपचे आमदार अमोल मिटकरी यांची स्पष्टोक्ती

मंगेश व्यवहारे नागपूर : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे मंत्रिपदे रखडलेली नाहीत. त्यांना गळ्याचा संसर्ग (थ्रोट इन्फेक्शन) झाल्यामुळे डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले होते,’ अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी अपचे आमदार अमोल मिटकरी यांनी बुधवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. 

उपमुख्यमंद्धी अजित पवार हे मंगळवारी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले नव्हते. ते आमदार, कार्यकर्त्यांनादेखील भेटत नव्हते. त्यामुळे ते मंत्रिपदावरून नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, बुधवारी अजित पवार सभागृहात परतले. तत्पूर्वी, त्यांनी त्यांच्या ‘विजयगड’ या शासकीय निवासस्थानी सकाळी सहा वाजतापासून कार्यकर्त्यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार मिटकरी म्हणाले,‘दादांना कुठलाही राजकीय आजार जखडलेला नाही. सतत कामात व्यस्त असल्यामुळे काही मानवी मर्यादा असतात. त्यांना थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळे डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते नॉट रिचेबल होते. त्यांच्यामुळे मंत्रिपदेदेखील रखडलेली नाहीत.’ शशिकांत शिंदे-अजित पवार भेटीवर बोलताना ते म्हणाले,‘सत्तेबाहेर असलेल्यांपैकी अनेक जण अस्वस्थ आहेत. शशिकांत शिंदेदेखील त्यातील एक आहेत. त्यामुळे त्यांनी अजितदादांची भेट घेतली असावी. शिंदे उगाच अजितदादांची भेट घेणार नाही.’ 

भुजबळांची नाराजी दादा स्वत: दूर करतीलछगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची नाराजी स्वत: अजित पवार दूर करतील. आज त्यांचा नाशिक येथे मेळावा आहे. तिथे ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील, अशी अपेक्षा असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. मात्र, भुजबळांच्या काही उतावीळ कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या फोटोला जोडे मारून केलेले आंदोलन आम्ही खपवू घेणार नाही, असा इशारादेखील त्यांनी दिला. 

रेशीमबागेत जाणार नाहीनव्याने आमदारकीची शपथ घेतलेले आमदार रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसराला भेट देत असतात. तिथे त्यांना संघाच्या सेवकार्याबाबत माहिती देण्यात येते. यंदा हा वर्ग गुरुवारी होणार असल्याची माहिती असून मी जाणार नसल्याचे मिटकरी म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAmol Mitkariअमोल मिटकरीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर