खाणीतील पाण्यात बुडून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST2021-06-25T04:07:54+5:302021-06-25T04:07:54+5:30

सावनेर : वेकाेलि खाणीतील पाण्यात बुडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्यांतर्गतच्या खाण क्रमांक ३, वाघाेडा येथे ...

Mine worker drowns | खाणीतील पाण्यात बुडून कामगाराचा मृत्यू

खाणीतील पाण्यात बुडून कामगाराचा मृत्यू

सावनेर : वेकाेलि खाणीतील पाण्यात बुडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्यांतर्गतच्या खाण क्रमांक ३, वाघाेडा येथे मंगळवारी (दि. २२) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

मिलिंद पांडुरंग माेगरे (५८, रा. शक्तीनगर, क्वाॅर्टर नं. ७२/१ डब्ल्यूसीएल काॅलनी, सावनेर) असे मृत कामगाराचे नाव आहे. मिलिंद माेगरे हे साेमवारी रात्री ११.४५ वाजता नेहमीप्रमाणे डब्ल्यूसीएल खाण वाघाेडा येथे आपल्या कामावर गेले हाेते. दरम्यान, ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घेतला असता, अमरदीप माेहन गुप्ता, रा. शक्तीनगर वाघाेडा यांनी घरी येऊन मिलिंद माेगरे हे खाणीत कामावर असताना पाण्यात बुडून मरण पावले. याप्रकरणी मृगया मिलिंद माेगरे (२३, रा. शक्तीनगर, क्वाॅर्टर नं. ७२/१ डब्ल्यूसीएल काॅलनी, सावनेर) यांच्या तक्रारीवरून सावनेर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सहायक फाैजदार तिवारी करीत आहेत.

Web Title: Mine worker drowns