एटीएम हॅक करून लाखो रुपये लंपास ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST2021-06-18T04:07:13+5:302021-06-18T04:07:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एटीएम हॅक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीने एसबीआयच्या एटीएममधून लाखो रुपये लंपास केले. या टोळीने दोन ...

Millions of rupees hacked by ATM hacking () | एटीएम हॅक करून लाखो रुपये लंपास ()

एटीएम हॅक करून लाखो रुपये लंपास ()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एटीएम हॅक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीने एसबीआयच्या एटीएममधून लाखो रुपये लंपास केले. या टोळीने दोन दिवसात पाच ठिकाणी हात साफ केला. बजाजनगर पाेलिसांनी २.३० लाख रुपयाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

बजाजनगर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या व्हीएनआयटीत एसबीआयची शाखा आहे. १४ जून रोजी अज्ञात आरोपीने एकाच एटीएम कार्डचा २३ वेळा वापर करीत २.३० लाख रुपये काढले. प्रत्येक वेळी एटीएममधून रोख रक्कम निघाल्यानंतरही ट्रान्झेक्शन फेल असे येत होते. यामुळे कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची नोंद झाली नाही. १५ जून रोजी एटीएममध्ये रोख रक्कम जमा करताना २.३० लाख रुपयाचे अंतर दिसून आले. पैसै जमा करणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता एटीएमच्या सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद व्यक्ती आढळून आले. त्यांनी १४ जून रोजी सकाळी ९.२३ वाजेपासून दुपारी ३.०५ वाजेपर्यंत २३ वेळा ट्रांझेक्शन केले होते. ट्रांझेक्शन करताना पैसे निघण्याच्या ठिकाणी हात ठेवायचे. त्यामुळे पैसे निघत असल्याचे दिसून येत नव्हते. इतर एटीएममधून सुद्धा याच पद्धतीने पैसे काढण्यात आल्याची माहितीही अधिकाऱ्यांना मिळली. यानंतर व्हीएनआयटी शाखेचे अधिकारी रामभाऊ तकतेवाले यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

सूत्रानुसार दीनदयालनगर, सेंट्रल एव्हेन्यू आणि वर्धमाननगर येथील एटीएममधून ससुद्धा याच पद्धतीने रोख रक्कम काढण्यात आली आहे. असे सांगितले जाते की. रक्कम जमा करणे आणि काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनलाच निशाना बनवण्यात आला आहे.. ही मशीन एका विशेष कंपनीची आहे. आरोपींनी एटीएमच्या तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती असल्याचा संशय आहे. त्यामुळे ते पैसे काढण्यास यशस्वी ठरले. दीड वर्षांपूर्वी सुद्धा अशा प्रकारे एका विशेष कंपनीच्या एटीएममधून रोख रक्कम काढण्यात आली होती. त्या प्रकरणात हरियाणा येथील आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या हाती लागली होती. या टोळीशी संबंधित लोकही एटीएमचे टेक्निशियन होते. ताज्या प्रकरणातही याच टोळीचा हात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. ज्या व्यक्तीच्या एटीएम कार्डचा वापर करून ही फसवणूक करण्यात आली त्या व्यक्तीचा शोध बजाजनगर पोलीस घेत आहे..

Web Title: Millions of rupees hacked by ATM hacking ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.