दुधाच्या किमतीत २ ऑगस्ट पासून वाढ होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:42+5:302021-07-31T04:09:42+5:30
कामठी: कामठी तालुक्यात दुधाच्या किमतीत २ ऑगस्टपासून पाच रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय तालुका दूध उत्पादन संघाच्यावतीने घेण्यात आला ...

दुधाच्या किमतीत २ ऑगस्ट पासून वाढ होणार
कामठी: कामठी तालुक्यात दुधाच्या किमतीत २ ऑगस्टपासून पाच रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय तालुका दूध उत्पादन संघाच्यावतीने घेण्यात आला आहे. दूध निम्बाजी वस्ताद अखाडा सभागृहात गोपालक मतीराम इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत हा निर्णय घेण्यात आला. गोवंश पालकांनी गोपालनात वाढलेल्या खर्च, चारा, ढेप-कुटारच्या वाढत्या किमतीत आता आपण देत असलेल्या दराने दूध देऊ शकत नाही असे अनेक सदस्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यामुळे दुधाच्या किमतीत वाढ करावी या मुद्यावर चर्चा झाली. २ ऑगस्टपासून दुधाच्या किमतीत प्रती लिटर ५ रुपये वाढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जे याचे पालन करणार नाहीत त्यावर दूध संघटनेच्यावतीने कारवाई करण्यात येईल असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले. बैठकीला रोशन राधेलाल यादव, विजय सत्यनारायण यादव, दीपक मोहनसिंह सीरिया, मोतीराम इंगोले, उमेश मोहड, गज्जू दुर्गा प्रसाद यादव, पप्पू दीनदयाल यादव, खुशाल गुलाबराव विखे, बलवंतराव धर्मराज रडके, वासुदेव गणपत शिवारकार, आरिफ डेरी वाले, शाहनवाज कुरेशी, नरेश शेषराव जीवतोडे, रेखचंद गोयले, तेजराम ठाकरे, प्रवीण वाणी, अमोल यादव, प्रीतम यादव, अशोक यादव, शेख अमीर करीम, आदित्य मोहोड, सोनू यादव, वसीम शेख आदी उपस्थित होते.