शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मिलिटरी स्पेशल रेल्वेगाडी रुळावरून घसरली : नागपूर यार्डातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 21:22 IST

गुवाहाटीवरून सैन्यदलाचे साहित्य घेऊन आंध्र प्रदेशातील बापटला येथे जात असलेल्या मिलिटरी स्पेशल रेल्वेगाडीची चार चाके नागपूर यार्डात डी कॅबिनजवळ रुळावरून घसरल्यामुळे मंगळवारी दुपारी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. युद्धपातळीवर घसरलेली चाके रुळावर आणण्याचे काम सुरू झाले. दुपारी ४ वाजेपर्यंत घसरलेल्या वॅगनची चाके रुळावर आणण्यात यश मिळाले. सुदैवाने मेन लाईनवर ही घटना घडली नसल्यामुळे या घटनेचा रेल्वे वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही.

ठळक मुद्देगुवाहाटीवरूनजात होती बापटलाकडेतीन रेल्वेगाड्यांना अर्धा तास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुवाहाटीवरून सैन्यदलाचे साहित्य घेऊन आंध्र प्रदेशातील बापटला येथे जात असलेल्या मिलिटरी स्पेशल रेल्वेगाडीची चार चाके नागपूर यार्डात डी कॅबिनजवळ रुळावरून घसरल्यामुळे मंगळवारी दुपारी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. युद्धपातळीवर घसरलेली चाके रुळावर आणण्याचे काम सुरू झाले. दुपारी ४ वाजेपर्यंत घसरलेल्या वॅगनची चाके रुळावर आणण्यात यश मिळाले. सुदैवाने मेन लाईनवर ही घटना घडली नसल्यामुळे या घटनेचा रेल्वे वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही.

मंगळवारी दुपारी सैन्यदलाचे साहित्य घेऊन मिलिटरी स्पेशल रेल्वेगाडी आंध्र प्रदेशातील बापटलाकडे जात होती. या स्पेशल गाडीला ३४ वॅगन आणि कोच होते. यात मिलिटरीचे ट्रक, मोठे जनरेटर आदी साहित्य होते तर कोचमध्ये मिलिटरीचे अधिकारी आणि जवान होते. ही गाडी मेन लाईनवरून दुपारी १.२५ वाजता नागपूर रेल्वे स्थानकाच्या यार्डात शिरताच डी कॅबिनजवळ या गाडीच्या ५०११९० आणि ८६०४४३ क्रमांकाच्या वॅगनची चार चाके रुळावरून घसरली. घटनेची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. माहिती मिळताच रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर सिंह उप्पल, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, एन. के. भंडारी, वरिष्ठ विभागीय अभियंता पवन पाटील, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता अखिलेश चौबे, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा, निरीक्षक वीरेंद्र वानखेडे घटनास्थळी पोहोचले. लगेच रुळावरून घसरलेल्या वॅगनची चाके रुळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. तब्बल अडीच तासानंतर दुपारी ४ वाजता रुळावरून घसरलेली वॅगनची चाके रुळावर आणण्यात यश आले. त्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. ही घटना डी कॅबिनजवळ यार्डात घडली. यामुळे हावडा मार्गावरील १२९९४ पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस, १८०९४ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्स्प्रेस आणि १२२१४ दिल्ली-यशवंतपूर दुरांतो एक्स्प्रेस या तीन गाड्यांना अर्धा तास विलंब झाला. 

 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात