शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

...आत्मसमर्पण झाले असते तर वाचला असता मिलिंद तेलतुंबडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 11:50 IST

मिलिंदने आत्मसमर्पण करावे, या संबंधाने व्यूहरचना केली होती. त्यानुषंगाने वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत पोलिसांनी मिलिंदला निरोप पाठविले होते. मिलिंदकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने मार्चमध्ये बालाघाटमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये या संबंधाने मध्यस्थाची बैठक अन् चर्चाही झाली होती.

ठळक मुद्देसात महिन्यांपासून सुरू होते प्रयत्न

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशातील नक्षल चळवळीतील शीर्षस्थ नेत्यांपैकी एक मानला जाणारा आणि गेल्या आठवड्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला नक्षलनेता मिलिंद ऊर्फ सह्याद्री ऊर्फ दीपक तेलतुंबडे याने आत्मसमर्पण करावे, यासाठी पोलिसांकडून गेल्या सात महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. मिलिंदने सकारात्मकता दाखविल्यामुळे बालाघाटमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये बैठकही पार पडली होती. मिलिंदने आत्मसमर्पण केले असते तर तो बचावला असता, असे शीर्षस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले असून, त्याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा मिळाला आहे.

१३ नोव्हेंबर २०२१ ला भल्या सकाळी गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी मारले गेले. त्यात मिलिंदचाही समावेश आहे. या चकमकीने आधीच बॅकफूटवर असलेल्या नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे. या चकमकीनंतर एकीकडे पोलिसांचे मनोबल वाढले आहे, तर दुसरीकडे नक्षल्यांचे पित्त खवळल्याने त्यांनीही मोठा धमाका करण्याची तयारी चालविली आहे. या पार्श्वभूमीवर, नक्षल चळवळीच्या नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अधिकृतपणे हे वृत्त पुढे आले.

यवतमाळ जिल्ह्यातील राजूर (ता. वणी) येथील रहिवासी असलेला आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला मिलिंद तेलतुंबडे १९९२-९३ पासून नक्षल चळवळीशी जुळला होता. १९९५-९६ ला तो खऱ्या अर्थाने पोलिसांच्या रेकॉर्डवर आला. त्याचे संघटन चळवळीतील काैशल्य बघता त्याला प्रतिबंधित माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य सचिवही बनविण्यात आले होते. देशभरातील अनेक घातपाती कृत्य आणि चकमकीत त्याने महत्त्वाची भूमिका वठविली होती. पोलिसांच्या विरोधातील त्याची घातक आक्रमकता बघता त्याच्यावर पोलिसांनी ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

नक्षल चळवळीत मिलिंदचे वजन वाढले असतानाच फेब्रुवारी-मार्चपासून त्याने त्याच्या काही अंतस्थ गोटातील व्यक्तींकडे आधीसारखी धावपळ होत नसल्याचे सांगितले होते. ते लक्षात घेता चंद्रपुरात काम केलेल्या आणि आता अतिरिक्त पोलीस महासंचालक असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने मिलिंदने आत्मसमर्पण करावे, या संबंधाने व्यूहरचना केली होती. त्यानुषंगाने वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत पोलिसांनी मिलिंदला निरोप पाठविले होते.

मिलिंदकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने मार्चमध्ये बालाघाटमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये या संबंधाने मिलिंदसोबत मध्यस्थाची बैठक अन् चर्चाही झाली होती. त्यानंतर भेटीगाठीचा दाैर सुरू असतानाच मिलिंद डावपेच करतो की काय, अशा काही घडामोडी घडल्या होत्या. दरम्यान, मे २०२१ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील खोब्रामेंढा जंगलात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत नक्षल कमांडर भास्कर इचामीसह ५ नक्षलवादी ठार मारले गेले. या चकमकीने महाराष्ट्रातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले गेल्याने अबूझमाडमध्ये देशभरातील शीर्षस्थ नक्षल नेत्यांनी बैठक बोलाविली. त्यात मिलिंदही सहभागी झाला.

अखेर कंठस्नान

अबूझमाडमधून परतल्यानंतर मिलिंद कमालीचा आक्रमक झाला होता. त्याने नक्षल नेता नंबाला केशव आणि भूपती यांना सोबत घेऊन महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्याची नवीन झोन कमिटी तयार केली. यानंतर मोठा अटॅक करण्याची तयारी मिलिंदने चालविली होती. दिवाळीनंतर मोठा धमाका होण्याचे सांकेतिक संदेश पोलिसांना मिळाले होते. त्याची ही तयारी बघता तो आत्मसमर्पण करणार नाही याची पोलिसांना कल्पना आली होती. त्यामुळे पोलिसांनी मिलिंदवरची नजर करडी केली अन् अखेर १३ नोव्हेंबरला मिलिंदसह २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घालण्यात यश मिळविले.

होय, आम्ही प्रयत्न केले - पोलीस महानिरीक्षक पाटील

या वृत्ताला दुजोरा देताना गोंदिया-गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील म्हणाले की, नक्षल्यांनी आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत. मिलिंद तेलतुंबडेनेही आत्मसमर्पण करावे यासाठी आम्ही मार्च २०२१ पासून प्रयत्न केले होते. प्रारंभी सकारात्मक प्रतिसादही मिळाला होता. मात्र, ते होऊ शकले नाही. अखेर मिलिंद पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस