शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:52 IST

मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील सुमारे १५ कंपन्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यासोबतच विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील १२ आरोग्य, शिक्षण, दळणवळण आदी क्षेत्रातील कामकाज सुरू झाले आहे.

ठळक मुद्दे‘मिशन बिगीन अगेन’ १५ उद्योगांमध्ये उत्पादनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘लॉकडाऊन’चा औद्योगिक क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. राज्य शासनाने ‘मिशन बिगीन अगेन’नुसार शारीरिक अंतरासह कोरोनाच्या संदर्भातील आवश्यक सर्व उपाययोजना लागू केल्यानंतर उद्योग सुरू करण्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील सुमारे १५ कंपन्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यासोबतच विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील १२ आरोग्य, शिक्षण, दळणवळण आदी क्षेत्रातील कामकाज सुरू झाले आहे.महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथील मिहान प्रकल्पात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत विविध कंपन्यांनी कामाला सुरुवात केली आहे. यामध्ये रिलायन्स (थाल्स), मेटाटेक, एअर सिस्टीम, इंडिया प्रा. लि., प्रवेश एक्सपोर्ट प्रा. लि. या कंपन्या १०० टक्के कर्मचारी उपस्थितीसह तसेच ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन लि., रिलायन्स (डीआरएएल), कनव अ­ॅग्रो, डाएट फूड इंटरनॅशनल, स्टेनोस्पेअर इंडिया प्रा. लि. आदी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनुसार सुरू झाल्या असून या कंपन्यांमध्ये २८ ते ७५ टक्के कर्मचारी व कामगार हजर आहेत. एअर इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये ८० कर्मचारी व १०० कामगार हजर असून नियमित कामाला सुरुवात झाली आहे. इतर उद्योगांमध्ये लुपिन लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजी, एक्झाविअर बीसीएस इन्फोसिस लि., टीसीएस लि., टेक महिन्द्रा आदी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग समूहांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. यापैकी बहुतांश ‘वर्क फ्रॉम होम’ यानुसार उद्योगाचे नियमित कामकाज सुरू आहे.मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर एम्स नागपूर, बीसीसीएल, बीपीएस, कॉन्कोर, डी.वाय. पाटील स्कूल, एफएससी महिन्द्रा डेव्हलपर प्रा.लि., मोराज इन्फ्रा प्रा.लि., प्लेनमटेट, टीसीआय इन्फ्रा लि., शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, भारतीय विद्या भवन आदी १२ सेवा क्षेत्रातील उद्योगांमध्ये ‘मिशन बिगीन अगेन’नुसार सुरुवात झाली आहे. मिहानच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रामध्ये असलेले विकास आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण प्रकल्प अल्टिएस, एसबीआय बँक, कॅनरा बँक, बालाजी सर्व्हिसेस येथेही सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आदींचा वापर करुन शासनाच्या विहित सूचनेनुसार कामकाज सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे तांत्रिक सल्लागार एस. व्ही. चहांदे यांनी दिली.

टॅग्स :Mihanमिहानnagpurनागपूर