शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

प्रवेशाच्या मागणीसाठी मध्यरात्री विद्यार्थी विद्यापीठात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 01:52 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ फेरमूल्यांकनाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. फेरमूल्यांकनामध्ये उत्तीर्ण होऊन देखील विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या काही विद्यार्थ्यांना मुदत संपल्याचे कारण देत प्रवेश नाकारले. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या मागणीसाठी शनिवारी सायंकाळी सुरू केलेले आंदोलन मध्यरात्री एक नंतरदेखील सुरू आहे. जोपर्यंत आम्हाला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

ठळक मुद्देमध्यरात्रीनंतरही ठिय्या आंदोलन सुरूच : सायंकाळी सुरू झाले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विद्यापीठात फेरमूल्यांकनावरून होणारे आंदोलन संपल्यातच जमा होते. मात्र फेरमूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुदत संपल्याचे कारण समोर करून प्रशासनाने प्रवेश नाकारला अन् फेरमूल्यांकनावरून बऱ्याच कालावधीने विद्यापीठात आंदोलन झाले. विशेष म्हणजे विरुद्ध विचारधारा असलेल्या एनएसयूआय व अभाविप या संघटना या मुद्यावरून एकत्र आल्या. 'एनएसयूआय'चे कार्यकर्ते व विद्यार्थी रात्री एक नंतरदेखील विद्यापीठातच होते.नागपूर विद्यापीठात प्रवेशाची अंतिम तारीख ६ आॅगस्ट होती. त्यानंतर विद्यापीठाने त्याला एक महिना मुदतवाढ दिली. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठीच ही प्रवेशाची मुदत असेल. फेरमूल्यांकनात उत्तीर्ण होणाºयांना अटींसह प्रवेश घेता येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. अभियांत्रिकीच्या फेरमूल्यांकनाचा निकाल १२ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. विद्यार्थी पुढील वषार्साठी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी गेले असता, त्यांना नकार देण्यात आला. प्रवेशाची मुदत उलटून गेली असल्याचे कारण त्यांना सांगण्यात आले.यानंतर अभाविप व एनएसयूआयचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांसमवेत शनिवारी सायंकाळी विद्यापीठात धडकले. फेरमूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली. सुरक्षारक्षकांनी तातडीने पावले उचलत विद्यापीठाचे सर्व दरवाजे बंद केले. सायंकाळी ६ नंतर शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली. मात्र कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनीदेखील नियमांचा हवाला देत विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला.विद्यापीठात नियमांचेच पालन : कुलगुरूविद्यार्थी संघटनांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर कुलगुरुंनी त्यांना दिलासा देण्यास नाकारले. प्रवेशाची अंतिम तिथी निघून गेली आहे. त्यामुळे आता प्रवेश देता येणार नाही. जर या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला तर पुढे लागणाºया फेरमूल्यांकन निकालानंतरदेखील प्रवेश द्यावा लागेल. असे झाले तर नियमानुसार ९० दिवसांचे शैक्षणिक सत्र पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे परीक्षेचे आयोजन करताना अडचणी येतील. विद्यापीठात नियमांचेच पालन करण्यात येईल, असे डॉ. काणे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन