मिहानला वीज मिळण्याचा मार्ग खुला

By Admin | Updated: May 29, 2014 03:23 IST2014-05-29T03:23:52+5:302014-05-29T03:23:52+5:30

मिहान-सेझमध्ये सवलतीच्या दरात वीज मिळण्याचे मार्ग आता खुले झाले आहेत.

Mhaña opened the way to get electricity | मिहानला वीज मिळण्याचा मार्ग खुला

मिहानला वीज मिळण्याचा मार्ग खुला

नागपूर : मिहान-सेझमध्ये सवलतीच्या दरात वीज मिळण्याचे मार्ग आता खुले झाले आहेत. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी हे शक्य झाल्याचे मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

मंत्रिपद मिळाल्यानंतर गडकरी मंगळवारी पहिल्यांदाच नागपुरात आले. त्यांनी विमानतळावर विजेच्या प्रश्नावर मिहान इंडस्ट्रीजचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) अधिकार्‍यांसोबत काही वेळ चर्चा केली. हा प्रश्न केंद्राच्या कॉर्मस मंत्रालयाकडे नेऊन तातडीने सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

ओपन अँक्सेससाठी मुख्यमंत्र्यांचा होकार

सध्या ओपन अँक्सेसद्वारे वीज देण्याची गोष्ट सुरू आहे. स्रोत एमएडीसी आहे.

या कंपनीने वीज खरेदी करून मिहान-सेझमधील उद्योगांना द्यायची आहे. आता अभिजित पॉवरकडून वीज मिळणार नाही, शिवाय महावितरणची ७ ते ८ रुपये प्रति युनिट दराची महागडी वीज उद्योगांना देणेही शक्य नाही.

ओपन अँक्सेसद्वारे टेरिफ कमी पडेल. वीज ओपन अँक्सेसद्वारे टॉवर एक्सचेंजकडून मिळेल. ही वीज उद्योगांना परवडणारी राहील. यावर दीर्घ चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mhaña opened the way to get electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.