मेट्रोच्या झिरो माईल्स स्टेशनला ‘फ्रीडम पार्क’ नाव देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST2021-06-16T04:10:13+5:302021-06-16T04:10:13+5:30

नागपूर : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान कार्यालयातर्फे अमृत महोत्सव सोहळयात झिरो माईल्स येथील मेट्रो स्टेशनचे नाव ‘झिरो ...

Metro's Zero Miles station will be named 'Freedom Park' | मेट्रोच्या झिरो माईल्स स्टेशनला ‘फ्रीडम पार्क’ नाव देणार

मेट्रोच्या झिरो माईल्स स्टेशनला ‘फ्रीडम पार्क’ नाव देणार

नागपूर : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान कार्यालयातर्फे अमृत महोत्सव सोहळयात झिरो माईल्स येथील मेट्रो स्टेशनचे नाव ‘झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन’ असे नामकरण करण्यात येणार आहे. या अनुषंगाने समितीने कस्तुरचंद पार्क मैदान येथे विकास कामे करतांना सापडलेल्या ऐतिहासिक तोफा झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन येथे ठेवण्यात येणार आहे. महामेट्रो नागपूरच्या या प्रस्तावाला नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या १५ जूनला झालेल्या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

हेरिटेज संवर्धन समितीची बैठक मंगळवारी छत्रपती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली. बैठकीत स्ट्रक्चरल अभियंता पी.एस. पाटणकर, नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रा. डॉ. शुभा जोहरी, वास्तु विशारद अशोक मोखा, उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम आणि सहाय्यक संचालक नगररचना हर्षल गेडाम उपस्थित होते.

महामेट्रोतर्फे फुटाळा तलावालगत प्रेक्षक गॅलरी व बोगद्याच्या बांधकामाकरिता दिलेल्या बांधकाम नकाशात दुरुस्ती करण्यात आली असून आता भूमिगत बोगदा बांधण्यात येणार नाही. तसेच फुटाळा येथे संगीतमय कारंजे, लाईट आणि साऊंड शो इत्यादी विकास कार्याला समितीने मंजूरी दिली आहे. महाल येथील कोतवाली पोलीस स्टेशन व पोलीस उपायुक्त परिमंडल-३ यांचे कार्यालय असलेली इमारत हेरिटेज ग्रेड-१ चे स्थळ आहे. या इमारतीला १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र-१ नागपूर यांनी या इमारतीचे व्हीएनआयटीकडून कल्चरल ऑडिट केले आहे. अहवालानुसार या इमारती ३ ते ४ वर्षांपेक्षा जास्त काळासाठी वापरण्यास सुरक्षित नाहीत. त्यामुळे कोतवाली पोलीस स्टेशन व पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ यांच्या कार्यालयाकरिता स्वतंत्र जागेची व बांधकामाकरिता निधीची व्यवस्था करावी, असे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र-१ नागपूर यांनी पोलीस उपायुक्त (मुख्यालय) पोलीस आयुक्त कार्यालयाला कळविले आहे.

Web Title: Metro's Zero Miles station will be named 'Freedom Park'